अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 14:55 IST2025-05-19T14:54:21+5:302025-05-19T14:55:49+5:30

Shilpa Shirodkar Tested Covid Positive: बिग बॉस १८ मधून प्रसिद्धीझोतात आलेली शिल्पा शिरोडकर कोव्हिड पॉझिटिव्ह

actress-shilpa-shirodkar-tests-corona-positive-request-all-to-wear-mask | अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती

अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती

Shilpa Shirodkar Tests Covid Positive: २०२० साली जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. मुंबईत पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. २ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचीही आज बातमी समोर आल. त्यातच आता एक अभिनेत्रीही कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. ९० च्या दशकात आघाडीवर असलेली आणि नुकतीच बिग बॉस १८ मुळे पुन्हा प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला (Shilpa Shirodkar) कोरोनाचं निदान झालं आहे. 

अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. ती लिहिते, "हॅलो मित्रांनो, माझी कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सुरक्षित राहा आणि मास्क घाला."


शिल्पाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसंच कोरोना पुन्हा आल्याने अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केलं आहे. सर्वांना पुन्हा मास्क घालण्याचं आवाहन केलं जात आहे. 

Web Title: actress-shilpa-shirodkar-tests-corona-positive-request-all-to-wear-mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.