"मुलाला कडेवर घेऊ शकत नाही"; अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी, गंभीर आजाराचा केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 10:53 IST2025-05-25T10:52:20+5:302025-05-25T10:53:38+5:30
मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रीला गंभीर आजार झाला असून त्याविषयी सांगताना अभिनेत्रीच्या डोळ्यांतून पाणी आलंय. जाणून घ्या

"मुलाला कडेवर घेऊ शकत नाही"; अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी, गंभीर आजाराचा केला खुलासा
एका अभिनत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून गंभीर आजाराचा खुलासा केलाय. याविषयी बोलताना अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी आलं. ही अभिनेत्री म्हणजे प्रिया मोहन. मल्याळम आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मोहनने नुकतंच तिच्या गंभीर आजाराविषयी खुलासा केलाय. प्रियाला फाइब्रोमायल्जिया (fibromyalgia) या आजाराचे निदान झाले आहे. ज्यामुळे तिला दैनंदिन कामात अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
प्रियाने केला गंभीर आजाराचा खुलासा
प्रियाने तिचा पती निहाल पिल्लईसोबत यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या चॅनलमध्ये प्रियाने तिच्या आजाराचा अनुभव सांगितला आहे. प्रिया म्हणाली, "मी इतक्या वेदनेत होते की माझ्या मुलाला उचलूही शकत नव्हते. अंघोळीनंतर केस पुसण्यासाठी टॉवेल लपेटणेही कठीण झाले होते." प्रियाला फाइब्रोमायल्जिया आजार झाला आहे. हा एक असा आजार आहे ज्यात संपूर्ण शरीरात वेदना, थकवा, झोपेची समस्या आणि मानसिक तणाव यांसारखी लक्षणे दिसतात. या आजारामुळे अभिनेत्रीला दैनंदिन आयुष्यातील साधी-सोपी कामं करणेही कठीण झाले आहे. "कपडे बदलणे, मुलाला जेवण देणे, अशी कामं करतानाही त्रास व्हायचा", असा खुलासा प्रियाने केलाय.
आजाराचा वेदनादायाी अनुभव
या आजाराचा अनुभव शेअर करताना प्रिया भावुक झाली. ती म्हणाली, "मी अनेकदा विचार करत होते की मला अशा प्रकारे का जगावे लागते आहे." प्रियाने तिच्या अनुभवातून इतरांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून फाइब्रोमायल्जिया सारख्या दुर्मिळ आजाराबद्दल समाजात अधिक गांभीर्य निर्माण होईल. प्रिया मोहनने आजाराविषयी खुलासा केल्याने अनेकांनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला असून धीर दिला आहे