"शाहरुखला कानाखाली मारली तेव्हा सेटवर...", अभिनेत्रीने 'जोश'मधील त्या सीनची सांगितली गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 11:30 IST2025-05-30T11:29:51+5:302025-05-30T11:30:40+5:30

मी खरं सांगते माझ्या पूर्ण फिल्मी करिअरमध्ये यापेक्षा लज्जास्पद गोष्ट...

actress priya gill recalls scene when she slapped shahrukh khan in the josh movie | "शाहरुखला कानाखाली मारली तेव्हा सेटवर...", अभिनेत्रीने 'जोश'मधील त्या सीनची सांगितली गोष्ट

"शाहरुखला कानाखाली मारली तेव्हा सेटवर...", अभिनेत्रीने 'जोश'मधील त्या सीनची सांगितली गोष्ट

२००० साली आलेला 'जोश' सिनेमा आठवतोय? शाहरुख खान आणि ऐश्वर्या रायने यामध्ये भावाबहिणीची भूमिका केली होती. तर अभिनेत्री प्रिया गिल (Priya Gill) शाहरुखची हिरोईन होती. एका सीनमध्ये ती शाहरुखच्या कानाखाली मारते. आता नुकतंच प्रिया गिलने त्या सीनची आठवण शेअर केली आहे. तो सीन शूट झाला तेव्हा सेटवर भयाण शांतता पसरली होती असं ती म्हणाली. नक्की काय झालं होतं?

'लेहरें'ला दिलेल्या मुलाखतीत प्रिया गिल म्हणाली, "मी खरं सांगते माझ्या पूर्ण फिल्मी करिअरमध्ये यापेक्षा लज्जास्पद गोष्ट दुसरी कोणती नसेल. मला गाण्याची सुरुवातीला शाहरुखला कानाखाली मारायची असते. आम्ही गोव्यात सतत तो सीन करत होतो. दिग्दर्शक मला सारखं सांगत होते की प्रिया हा सीन पाहिजे तसा होत नाहीये. तू त्याच्यावर नाराज आहेस हे दिसलं पाहिजे. मी म्हणायचे, 'हो ठीक आहे'. मी प्रयत्न करत होते. मग शाहरुख मला म्हणाला, 'तू मला मार..मार'. मंसूरही म्हणाले, 'त्या मार..मार'. मग शेवटी मी त्याला जोरात कानाखाली मारलं. तो सीन मी कधीच विसरु शकत नाही."

ती पुढे म्हणाली, "मी जेव्हा त्याला कानाखाली मारलं तेव्हा सेटवर भयाण शांतता पसरली होती. कॅमेरा सुरुच होता. मला वाटतं दिग्दर्शकही कट म्हणायचं विसरले होते कारण तो क्षणच असा होता. मला आठवतंय नंतर कॅमेरामन केवी मला म्हणाला की,  'शाहरुखला मारल्यामुळे मुली आता तुझा तिरस्कार करतील.' नंतर गाणं सुरु होतं. मी संपूर्ण गाण्यात टेन्शनमध्येच होते.

प्रिया गिलने 'तेरे मेरे सपने' सिनेमातून पदार्पण केलं होतं. नंतर ती 'सिर्फ तुम' मध्ये दिसली. संजय कपूरसोबत तिची जोडी होती.  हा सिनेमा खूप गाजला होता. नंतर प्रिया लग्न करुन डेन्मार्कला सेटल झाली. २००६ मध्ये प्रियाने अभिनयाला सोडला.

 

Web Title: actress priya gill recalls scene when she slapped shahrukh khan in the josh movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.