हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 12:18 IST2025-05-02T12:18:08+5:302025-05-02T12:18:29+5:30

निक्की तांबोळी ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. परंतु नुकतंय निक्कीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची गोष्ट सांगितली आहे. इतकंच नव्हे निक्की ICU मध्ये उपचार घेती असंही तिने सांगितलं. काय घडलं नेमकं? (nikki tamboli)

actress nikki tamboli admitted in hospital icu due to lungs collapsed and allergy of prawns | हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?

हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?

'बिग बॉस हिंदी', 'बिग बॉस मराठी', 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' यांसारखे लोकप्रिय शो गाजवणारी अभिनेत्री आणि मॉडेल म्हणजे निक्की तांबोळी. निक्की (nikki tamboli) कायमच तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल जाहीरपणे सांगत आली आहे. अशातच निक्कीने एका मुलाखतीत ती काही दिवसांपूर्वी ICU मध्ये दाखल असल्याचा धक्कादायक खुलासा केलाय. त्यामुळे तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. काय म्हणाली निक्की? जाणून घ्या

निक्की तांबोळी ICU  मध्ये होती कारण..

पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत निक्कीने खुलासा केला की, "ही गोष्ट कोणाला माहिती नाही. मी याविषयी सोशल मीडियावरही काही पोस्ट केलं नाही. ४ दिवसांपूर्वी मी ICU मध्ये अॅडमिट होते. मी एका रेस्टॉरंटमध्ये मित्रांसोबत जेवायला गेले होते. शेलफिश खाऊन एलर्जी होईल हे माझ्या ध्यानीमनीही नव्हतं.  मी त्यादिवशी ४ मोठे प्रॉन्स (कोळंबी) खाल्ले. त्यामुळे माझ्या शरीरावर मोठा परिणाम झाला. माझी फुफ्फुस काम करायचं बंद झालं. माझे डोळे सुजून ते मोठे झाले. चेहऱ्यावर फेस आला आणि संपूर्ण अंगावर खाज येत होती. चेहरा प्रचंड सुजला आणि मोठा झाला.  शरीराच्या आतील ऑर्गन्स सुजल्यामुळे एकमेकांसोबत चिकटले आणि माझा श्वास जवळपास थांबला होता."





निक्कीला तिच्या मित्रांनी तिला तातडीने व्हीलचेअरवर बसवलं आणि डॉक्टरांकडे घेऊन गेले. निक्कीची अवस्था पाहून तिला तत्काळ ICU मध्ये दाखल करण्यात आलं. "त्यानंतर इमर्जन्सी केसमध्ये जी औषधं दिली जातात ती मला देण्यात आली. २ दिवस मी ICU मध्येच होते. माझा बॉयफ्रेंड आणि माझं कुटुंब माझ्यासोबत होतं. यापुढे माझे आवडते असूनही मी कधीही प्रॉन्स खाणार नाही", असं निक्की म्हणाली. निक्की सध्या ठीक असून तिच्या चाहत्यांनी हे ऐकताच सुटकेचा श्वास सोडला

Web Title: actress nikki tamboli admitted in hospital icu due to lungs collapsed and allergy of prawns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.