"सूर्यकुमार यादव मला खूप मेसेज करायचा, पण आता...", बोल्ड कंटेटमुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्रीचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 12:34 IST2025-12-30T12:31:58+5:302025-12-30T12:34:13+5:30
खुशीने भारताचा स्टार क्रिकेटर असलेल्या सूर्यकुमार यादवबाबत खळबळजनक खुलासा आहे. सूर्यकुमार यादव सतत तिला मेसेज करायचा. एवढंच नव्हे तर अनेक क्रिकेटर्सही तिच्या मागे लागले असल्याचा दावाही खुशीने केला आहे.

"सूर्यकुमार यादव मला खूप मेसेज करायचा, पण आता...", बोल्ड कंटेटमुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्रीचा खळबळजनक दावा
मॉडेल आणि अभिनेत्री असलेली खुशी मुखर्जी कायमच चर्चेत असल्याचं दिसतं. खुशीचे सोशल मीडिया सेन्सेशन आहे. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण, सध्या खुशी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. खुशीने भारताचा स्टार क्रिकेटर असलेल्या सूर्यकुमार यादवबाबत खळबळजनक खुलासा आहे. सूर्यकुमार यादव सतत तिला मेसेज करायचा. एवढंच नव्हे तर अनेक क्रिकेटर्सही तिच्या मागे लागले असल्याचा दावा खुशीने केला आहे.
एका क्लिनिकच्या उद्धाटनासाठी खुशी मुखर्जीने हजेरी लावली होती. यावेळी पापाराझींच्या कॅमेऱ्यात खुशी कैद झाली. तिला पापाराझींनी विचारलं की कोणत्या क्रिकेटरला तुला डेट करायला आवडेल? त्यावर खुशीने उत्तर देताना सूर्यकुमार यादवबाबत खळबळजनक खुलासा केला. खुशी म्हणाली, "मला कोणत्याही क्रिकेटरला डेट करायचं नाही. अनेक क्रिकेटर्स माझ्या मागे लागले होते. सूर्यकुमार यादव मला खूप मेसेज करायचा. पण आता आमच्यात फार बोलणं होत नाही. मला माझं नाव त्याच्यासोबत जोडलेलं नकोय". खुशीच्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
खुशी मुखर्जी कोण आहे?
खुशी मुखर्जी ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. काही मालिका आणि सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे. बॉलिवूडसोबतच काही साऊथ सिनेमांमध्येही खुशी झळकली आहे. हार्ट अटॅक, डोंगा प्रेमा, श्रीनगर, अंजाल थुराई या सिनेमांमध्ये खुशी दिसली होती. तर नादान, बालवीर, देविका या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. बोल्ड कंटेटच्या वेब सीरिजमध्येही खुशी भूमिका साकारताना दिसली. बोल्ड कंटेटमुळे ती प्रचंड चर्चेत असते. 'स्प्लिट्सव्हिला १०' आणि 'लव्ह स्कूल ३' या रिएलिटी शोमध्येही तिने सहभाग घेतला होता.