वयाच्या ४१ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं लग्न, वृंदावन मंदिरात अभिनेत्यासोबत अडकली विवाहबंधनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 08:30 IST2025-11-24T08:27:41+5:302025-11-24T08:30:47+5:30
वृंदावनातील मंदिरात सेलिब्रिटी जोडप्याने लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर येताच चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे

वयाच्या ४१ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं लग्न, वृंदावन मंदिरात अभिनेत्यासोबत अडकली विवाहबंधनात
टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून एक आनंदाची बातमी समोर येतेय. टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत जोड्यांपैकी एक असलेल्या अश्लेषा सावंत (Ashlesha Sawant) आणि संदीप बसवाना (Sandeep Baswana) यांनी तब्बल २३ वर्षांच्या 'लिव्ह-इन रिलेशनशिप'नंतर अखेर लग्न केले आहे. या दोघांनी १६ नोव्हेंबर २०२५ रोजी वृंदावन येथील चंद्रोदय मंदिरात एका अत्यंत खासगी समारंभात सात फेरे घेतले. त्यांच्या लग्नाचे फोटो नुकतेच समोर आले आहेत.
'क्योंकि सास भी कभी बहू थी' सेटवर झाली भेट
अश्लेषा सावंत आणि संदीप बसवाना यांची पहिली भेट २००२ मध्ये 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या लोकप्रिय मालिकेच्या सेटवर झाली होती. तेव्हापासून हे दोघे एकत्र आहेत. इतकी वर्षे एकत्र राहिल्यानंतरही ते लग्न का करत नाहीत, याबद्दल त्यांना अनेकदा विचारले जायचे. पण अखेर त्यांनी लग्न केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत संदीप बसवाना यांनी सांगितले की, "मी आणि अश्लेषा एप्रिलमध्ये वृंदावनला गेलो होतो. तिथे राधा-कृष्णाच्या मंदिरांशी आमचे खूपच भावनिक नाते जुळले. त्यामुळे २३ वर्षांच्या सहवासानंतर लग्न करण्यासाठी आम्हाला प्रेरणा दिली. घरातल्यांना तर याचा खूप आनंद झाला आहे, कारण ते खूप दिवसांपासून याची वाट बघत होते. आम्हाला लग्न साध्या पद्धतीने करायचे होते. त्यामुळे भगवान कृष्णाच्या मंदिरात विवाह करण्यापेक्षा चांगले ठिकाण कोणते असू शकते?"
अश्लेषाने आपली भावना व्यक्त करताना सांगितले की, "आयुष्यातील प्रेमासोबत लग्न झाल्याचा मला खूप आनंद आहे. वृंदावन हे त्यासाठी योग्य ठिकाण होते. हा निर्णय अचानक घेतला गेला. याशिवाय आम्ही फक्त कुटुंब आणि मित्रमैत्रिणींनाच याविषयी सांगितलं."
सोशल मीडियावर शेअर केले फोटो
लग्न झाल्यानंतर या जोडप्याने सोशल मीडियावर गुलाबी रंगाच्या पोशाखातील सुंदर फोटो शेअर केले आहेत. "आणि अशा प्रकारे, मिस्टर अँड मिसेस म्हणून आम्ही एका नवीन अध्यायात पाऊल ठेवले. तुमच्या सर्व आशीर्वादांसाठी आम्ही कृतज्ञ आहोत," असे त्यांनी फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
संदीप यांनी मस्करीत सांगितले की, "इतकी वर्षे एकत्र राहूनही लग्न का करत नाही, या प्रश्नांची उत्तरे देऊन आम्ही दोघेही थकून गेलो होतो. माझ्यासाठी तर, मी आणि अश्लेषा नेहमीच विवाहित होतो. काहीतरी वेगळे घडले आहे असे मला वाटत नाहीये. एक दिवस लग्न करायचंच होतं, त्यामुळे हा दिवस पार पडला."
अश्लेषा सावंत सध्या 'झनक' मालिकेत दिसत आहे, तर संदीप बसवाना यांनी अलीकडेच 'अपोलीना' या मालिकेत काम केले होते. टेलिव्हिजन जगतातील या लोकप्रिय जोडप्याने इतक्या मोठ्या काळात एकमेकांची साथ दिल्यानंतर आता अधिकृतपणे विवाहबंधनात अडकल्याबद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केलं आहे.