राझीच्या यशानंतर आलियाचे भाव वधारले, आता एका सिनेमासाठी घेणार इतकं मानधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 16:17 IST2018-05-31T16:15:21+5:302018-05-31T16:17:08+5:30
राझी हा सिनेमा अजूनही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या सिनेमाच्या यशानंतर आलियाचं स्टारडमही वाढलं आहे.

राझीच्या यशानंतर आलियाचे भाव वधारले, आता एका सिनेमासाठी घेणार इतकं मानधन
मुंबई : सध्या बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट ही 'राझी'च्या यशाचा आनंद साजरा करत आहे. 'राझी' हा सिनेमा अजूनही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असून या सिनेमाच्या यशानंतर आलियाचं स्टारडमही वाढलं आहे. त्यामुळे आता आलियाने आपलं मानधनही वाढवल्याचं बोललं जातंय.
नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, प्रत्येक सिनेमासाठी 5 कोटी रुपयांचं मानधन घेणाऱ्या आलियाने आपलं मानधन वाढवून 9 कोटी रुपये केलं आहे. अशीही माहीती आहे की, आलिया आता जे सिनेमे साईन करत आहे त्यासाठी तिला 9 कोटी रुपये मिळत आहे. गेल्या पाच वर्षाच केलेले आलियाचे जवळपास सगळेच सिनेमे हिट ठरले आहेत. त्यामुळे आता राझीच्या यशानंतर तिचे भाव वधारले आहेत.
अशीही चर्चा आहे की, आलियाचं मानधन वाढवण्यात सर्वात मोठा हात हा निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याचा आहे. त्याने आलियाचं भरभरुन कौतुक करायलाही सुरुवात केली आहे. अनेक सिनेमे आलियाने एकटीने सुपरहिट केले आहेत. बॉलिवूडमध्ये महिलाप्रधान सिनेमे फारच कमी वेळा 100 कोटींचा आकडा पार करतात. आलियाच्या राझीने हा आकडा पार केलाय. त्यामुळेही हे मानधन आलियाने वाढवलं असं बोललं जात आहे.