"त्याला आणखी पैशांची गरज..!", अभिनेता कॅन्सरच्या चौथ्या स्टेजवर, 'तारक मेहता..' फेम अभिनेत्रीने केलं मदतीचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 14:01 IST2025-05-27T14:00:45+5:302025-05-27T14:01:53+5:30

दुःखद! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचा कॅन्सरच्या चौथ्या स्टेजशी लढा. तारक मेहता.. मधील अभिनेत्रीने लोकांकडे केलं मदतीच आवाहन

Actor vaibhav raghav battle with stage 4 cancer Taarak Mehta fame actress simple kaul appeals for help | "त्याला आणखी पैशांची गरज..!", अभिनेता कॅन्सरच्या चौथ्या स्टेजवर, 'तारक मेहता..' फेम अभिनेत्रीने केलं मदतीचं आवाहन

"त्याला आणखी पैशांची गरज..!", अभिनेता कॅन्सरच्या चौथ्या स्टेजवर, 'तारक मेहता..' फेम अभिनेत्रीने केलं मदतीचं आवाहन

'निशा और उसके कजिन्स' या मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेला अभिनेता विभू राघव (वैभव कुमार सिंह राघव) सध्या स्टेज ४ कॅन्सरशी लढा देत आहे. वैभवला २०२२ साली कॅन्सरचे निदान झाले असून, मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. पण तिथून वैभवला नानावटी रुग्णालयात हलवण्यात आले. वैभवच्या उपचारांसाठी पैशांची गरज असून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेत्री सिंपल कौलने त्याच्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचं आवाहन केलं आहे.

वैभवला स्टेज ४ कॅन्सर

'तारक मेहता..' फेम अभिनेत्री सिंपल कौलने वैभवच्या प्रकृतीविषयी अपडेट देताना सांगितलं की,  "नमस्कार सगळ्यांना! आपल्या मित्राविषयी, वैभवविषयी थोडी माहिती शेअर करतेय. सध्या तो नानावटी रुग्णालयात गेल्या दोन आठवड्यांपासून स्टेज ४ कॅन्सरशी लढा देत आहे. हे सर्व पाहणं आमच्यासाठी खूप भावनिक आणि अवघड प्रवास ठरतोय. विभू खूप धैर्याने या आजाराला सामोरा जात आहे. मात्र, आमचे सर्व आर्थिक स्रोत आता संपले आहेत. त्याच्या उपचारांसाठी तात्काळ पैशांची आवश्यकता आहे. कृपया तो लवकर बरा व्हावा म्हणून प्रार्थना करा आणि शक्य असेल तितकी मदत करा. तुमच्या प्रेम आणि प्रार्थनांसाठी खूप खूप धन्यवाद."  पुढे सिंपलने बँक अकाऊंट डिटेल्स सांगितले आहेत.


वैभवची कॅन्सरशी झुंज

वैभवच्या उपचारांचा खर्च खूप असल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी काही महिन्यांपूर्वीच निधी संकलन सुरू केले होते. अभिनेता मोहित मलिक आणि त्याची पत्नी अदिती मलिक, अभिनेत्री सौम्या टंडन, सिंपल कौल, मोहसिन खान आणि इतर सहकलाकारांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला आहे. परंतु वैभवच्या उपचारासाठी आणखी मदतीची गरज असल्याने सिंपल कौलने पुन्हा एकदा चाहत्यांना मदतीचं आवाहन करुन शक्य होईल तितकी रक्कम द्यायला सांगितली आहे.

Web Title: Actor vaibhav raghav battle with stage 4 cancer Taarak Mehta fame actress simple kaul appeals for help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.