"गेली १७ वर्ष आपण जो रस्ता चांगला होण्याची वाट बघतोय तो.."; वैभव मांगलेंचा कोकणी माणसाला खास सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 11:41 IST2025-08-25T11:39:44+5:302025-08-25T11:41:38+5:30
वैभव मांगलेंनी कोकणी माणसांसाठी खास पोस्ट लिहिली आहे. याशिवाय सावकाश या, घाई करु नका असा सल्लाही दिला आहे. काय म्हणाले?

"गेली १७ वर्ष आपण जो रस्ता चांगला होण्याची वाट बघतोय तो.."; वैभव मांगलेंचा कोकणी माणसाला खास सल्ला
गणपती उत्सवाला आता फक्त ३ दिवस बाकी आहेत. सर्वजण यंदा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी उत्सुक असतील यात शंका नाही. गणेशोत्सव म्हटलं की, कोकणी माणसं आपल्या गावी जाण्यासाठी उत्सुक असतात. मुंबईत राहणाऱ्या अनेक कोकणी माणसांच्या गावातील घरी गणपती उत्सव साजरा होतो. अशातच अभिनेते वैभव मांगले यांनी कोकणातील रस्त्यांच्या अवस्थेवर सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. काय म्हणाले वैभव मांगले? जाणून घ्या.
कोकणी रस्त्यांच्या अवस्थेवर वैभव काय म्हणाले?
वैभव मांगलेंनी कोकणातील रस्त्यांच्या अवस्थेवर सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट लिहून वैभव मांगले म्हणतात. "गेली १७ वर्ष आपण जो रस्ता चांगला होण्याची वाट पाहतोय तो आता होण्याच्या मार्गावर आहे …मी आजच आलो देवरुखला … माणगांवच्या आसपासचा रस्ता.. चिपळूण , संगमेश्वर येथला रस्ता अजून होणे बाकी आहे … तो ही त्या शहरातूनच जातो .."
"माणगाव , संगमेश्वर तर भीषण अवस्था आहे … तो कधी होईल .. किंवा होईल की नाही हे ही सांगता येत नाही . आजूबाजूला घनदाट वस्ती आहे . त्यातून कसा मार्ग काढणार आहेत कुणास ठाऊक … पण बाकी रस्ता झाला आहे आणि तो चांगला आहे … सावकाश या .. घाई करू नका.. विरुद्ध दिशेने गाड्या घालू नका.. चुकीच्या पद्धतीने गाडी ओव्हर टेक करू नका .त्याने अजून वाहतूक अवघड होते.. शुभ यात्रा." अशा शब्दात वैभव मांगलेंनी कोकणातील रस्त्यांच्या अवस्थेवर बोट ठेवलं आहे.