आता पंकज त्रिपाठी साकारणार बाबूभैय्या? अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाले- "माझा विश्वास बसत नाही, पण.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 12:00 IST2025-05-23T12:00:17+5:302025-05-23T12:00:38+5:30

परेश रावल यांनी हेरा फेरी ३ सोडल्यावर आता त्यांची जागी पंकज त्रिपाठी बाबूभैय्याची भूमिका साकारणार अशी चर्चा आहे. काय म्हणाले पंकज त्रिपाठी याविषयी?

actor pankaj tripathi replaced Paresh Rawal in hera pheri 3 playing role of babubhaiyya | आता पंकज त्रिपाठी साकारणार बाबूभैय्या? अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाले- "माझा विश्वास बसत नाही, पण.."

आता पंकज त्रिपाठी साकारणार बाबूभैय्या? अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाले- "माझा विश्वास बसत नाही, पण.."

परेश रावल (paresh rawal) यांनी 'हेरा फेरी ३' सोडला. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. परेश रावल यांनी  'हेरा फेरी ३' (hera pheri 3) सोडल्याने सिनेमाच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. आता परेश रावल यांची जागा कोण घेणार, याशिवाय  'हेरा फेरी ३'मध्ये बाबू भैय्याच्या भूमिकेत कोण दिसणार? याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. अशातच बाबूभैय्याच्या भूमिकेसाठी परेश रावल यांच्या जागी पंकज त्रिपाठींचं नाव पुढे आलं. काय म्हणाले पंकज त्रिपाठी बघा

बाबूभैय्याच्या भूमिकेत दिसणार पंकज त्रिपाठी?

पंकज त्रिपाठी सध्या त्यांची आगामी वेबसीरिज 'क्रिमिनल जस्टीस ४'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या प्रमोशनदरम्यान त्यांना 'हेरा फेरी ३' बद्दल विचारलं असता पंकज म्हणाले की, "लोकांनी बाबूभैय्याच्या जागी माझ्या नावाचा विचार केला, हे मी सुद्धा ऐकलंय आणि वाचलंय. परंतु माझा विश्वास यावर नाही. परेश रावलजी खूप कमाल अभिनेते आहे. मी त्यांचा खूप मान ठेवतो. परंतु या भूमिकेसाठी मी योग्य व्यक्ती नाही, असं मला वाटतं." अशाप्रकारे पंकज त्रिपाठींनी खुलासा केला. याशिवाय 'हेरा फेरी ३'मध्ये ते काम करणार नाहीत, याचाही खुलासा केलाय.

परेश रावल 'हेरा फेरी ३' सोडल्यानंतर केलं ट्विट?

परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'मधून बाहेर पडल्याचं काही दिवसांपूर्वी कन्फर्म केलं आहे. त्यांनी ट्वीट करत लिहिले, "मला इथे स्पष्ट करायचं आहे की हेरा फेरी ३ मधून बाहेर पडण्याचा निर्णय हा मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह डिफ्रंसमुळे घेण्यात आलेला नाही. मी पुन्हा सांगतो की माझे फिल्ममेकर्ससोबत कोणताही क्रिएटिव्ह मतभेद झालेले नाहीत. दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्याबद्दल माझ्या मनात खूप प्रेम, आदर आणि विश्वासाची भावना आहे." परेश रावल यांनी  'हेरा फेरी ३' सोडल्यावर अक्षय कुमारच्या कंपनीने त्यांच्यावर २५ कोटींचा दावा ठोकला होता. त्याविषयी परेश रावल यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Web Title: actor pankaj tripathi replaced Paresh Rawal in hera pheri 3 playing role of babubhaiyya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.