अभिनेता की नेता कन्फ्युजन नको... म्हणून अभिनेते व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 10:28 AM2021-10-28T10:28:03+5:302021-10-28T10:31:05+5:30

होय, इन्टाग्रामवर डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

actor and mp Dr. Amol Kolhe takes important decision regarding social media | अभिनेता की नेता कन्फ्युजन नको... म्हणून अभिनेते व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

अभिनेता की नेता कन्फ्युजन नको... म्हणून अभिनेते व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

googlenewsNext
ठळक मुद्देस्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेने डॉ. अमोल कोल्हे यांना प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची सर्वांगसुंदर भूमिका साकारत डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी मराठी मनावर अधिराज्य गाजवलं. उत्कृष्ट वक्ता आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारा खासदार अशीही त्यांची ओळख आहे. अभिनय आणि राजकारण यांची योग्य सांगड घालत अमोल कोल्हे यांचा प्रवास सुरू आहे. तूर्तास काय तर त्यांच्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. होय, इन्टाग्रामवर त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सोशल मीडियाबद्दलचा एक महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी जाहीर केला आहे.

 आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, ‘ इन्स्टाग्रामवर नजर टाकताना अनेकदा निदर्शनास आलं की पोस्ट वर प्रतिक्रिया देताना ‘अभिनेता’ की ‘नेता’ अशी अनेकांची गल्लत होते. राजकीय भूमिका प्रत्येकाची वेगळी असू शकते पण ती भूमिका पडद्यावरील, समाजमाध्यमावरील भूमिकेच्या आड येऊ नये असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळेच एक निर्णय घेतला आहे, इन्स्टाग्रामवर इथे राजकीय पोस्ट करायची नाही. म्हणजे  कन्फ्युजन नको. राजकीय पोस्टसाठी फेसबुक पेज आहेच. चालेल ना? ’
जबाबदार नागरिकाच्या भूमिकेतून मांडलेल्या विचाराला राजकीय भूमिका समजण्यात येऊ नये,’ अशी टीपही त्यांनी या पोस्टसोबत लिहिली आहे.
स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेने डॉ. अमोल कोल्हे यांना प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. अनेक ऐतिहासिक भूमिका साकारल्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड आदर आहे. शिवाय त्यांच्या उत्कृष्ट वकृत्व शैलीचेही लोक फॅन आहेत. साहजिकच गेल्या काही काळात ग्रामीण भागात अमोल कोल्हे यांचा मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होत, अमोल कोल्हे यांनी मोदी लाटे असतानाही लोकसभेची निवडणूक जिंकली. 2019 मध्ये महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ 4 खासदार निवडून आले. यामध्ये अमोल कोल्हे यांचा समावेश आहे.  

Web Title: actor and mp Dr. Amol Kolhe takes important decision regarding social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.