‘सध्या ती काय करत आहे’मधून अभिनय बेर्डेचे सिनेमात पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2016 16:02 IST2016-11-02T19:32:01+5:302016-11-03T16:02:26+5:30
मराठी चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपली खास ओळख निर्माण केली. आपल्या जबरदस्त कॉमिक टायमिंगमुळे त्याने मराठी चित्रपटातच नव्हे तर ...
.jpg)
‘सध्या ती काय करत आहे’मधून अभिनय बेर्डेचे सिनेमात पदार्पण
अभिनेता अंकुश चौधरी व आर्या आंबेकर यांची प्रमुख भूमिका असणाºया ‘ती सध्या काय करत आहे’ या चित्रपटात तो टीनएजर अंकुशची भूमिका साकारताना दिसेल. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यावर अभिनय बेर्डे यात महत्त्वाची भूमिका साकारत असल्याचे समोर आले आहे. आई-वडिलांचा वारसा अभिनय पुढे नेणार असल्याचे संके त मिळण्यास या टीझरच्या निमित्ताने समोर आले आहे.
दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे व प्रिया बेर्डे यांचा मोठा मुलगा अभिनय सध्या विविध एकांकीका स्पर्धांमधून नाट्य क्षेत्रात आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याने अनेक एकांकिका स्पर्धांचे विजेतेपद मिळविले आहे. तो स्वत:च्या बळावर सिनेमात आपले स्थान निर्माण करू पाहतोय. ‘ती सध्या काय करत आहे’ या चित्रपटात अंकुश चौधरी, आर्या आंबेकर यांच्यादेखील प्रमुख भूमिका आहेत.