"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 09:28 IST2026-04-05T09:26:29+5:302026-04-05T09:28:25+5:30

अभिषेक बच्चनने पहिल्यांदाच केला खुलासा

abhishek bachchan says he scared to walk on red carpet with wife aishwarya rai bachchan | "बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?

"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन इंडस्ट्रीतील पॉवर कपल आहेत. मधल्या काळात दोघांमध्ये बिनसल्याच्या चर्चा होत्या. अनेक कार्यक्रमांमध्ये ऐश्वर्या आणि आराध्या वेगळ्या दिसत होत्या. तर अभिषेक आईवडिलांसोबत येत होता. यावरुन दोघं घटस्फोट घेणार अशीही चर्चा झाली. मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांच्यात पुन्हा सगळं सुरळीत सुरु असल्याचं पाहायला मिळालं. अभिषेक पत्नी आणि लेकीसोबत व्हेकेशनवरही गेला. तसंच या चर्चा निव्वळ अफवा असल्याचं त्याने एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. तर आता अभिषेकने ऐश्वर्याबाबत केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. ऐश्वर्यासोबत रेड कार्पेटवर चालायला भीती वाटते असं तो म्हणाला.

लिली सिंहला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक बच्चनने वैयक्तिक आयुष्यावरही बातचीत केली. रेड कार्पेटवर पोहोचताच तू इतका गंभीर का दिसतो? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. तेव्हा अभिषेक म्हणाला, "तुम्ही माझ्या बायकोला पाहिलंय? रेड कार्पेटवर तिला पोज देताना बघितलंय? रेड कार्पेटवर चालणं माझ्यासाठी कठीण काम आहे आणि हेच जर माझ्या बायकोसोबत चालावं लागलं तर मला आणखी जास्त भीती वाटते. रेड कार्पेटवर कसं चालायचं, कशी पोज द्यायची, कुठे पाहायचं हे तिला माहित आहे. ती प्रोफेशनल आहे."

"घरात कोण पुरुष, कोण स्त्री अशी स्पर्धा..." अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायबद्दल मांडलं मत, म्हणाला...

तो पुढे म्हणाला, "रेड कार्पेटवर पोहोचताच मी स्वत:ला एखाद्या लाकडाच्या तुकड्यासारखा समजतो. कुठे बघायचं, काय करायचं, हात खिशात घालू की बाहेरच राहू देऊ हे मला काहीच कळत नाही. मी अनकम्फर्टेबल होतो. म्हणूनच फोटोग्राफर्स कायम सांगत राहतात - सर स्माईल प्लीज. एकदा तर एकाने मला विचारलं की, 'सर काही चूक झाली का? तुम्ही नाराज का आहात? तेव्हा मी म्हणालो, 'ओह! सॉरी'.

Web Title : ऐश्वर्या के साथ रेड कार्पेट पर चलने से डरते हैं अभिषेक बच्चन: वजह जानिए

Web Summary : अभिषेक बच्चन ने खुलासा किया कि ऐश्वर्या के साथ रेड कार्पेट पर चलने में उन्हें डर लगता है। उन्होंने उनकी व्यावसायिकता और संतुलन की प्रशंसा की, और स्वीकार किया कि वह ऐसी सेटिंग में असहज और अनिश्चित महसूस करते हैं, अपनी पत्नी के विपरीत।

Web Title : Abhishek Bachchan fears walking red carpet with Aishwarya Rai; Here's why

Web Summary : Abhishek Bachchan revealed he feels intimidated walking the red carpet with Aishwarya. He admires her professionalism and poise, admitting he feels awkward and unsure in such settings, unlike his wife.