Ravi Shastri: 'हा' खेळाडू असेल भारताचा आगामी टी-२० कर्णधार, रवी शास्त्रींची मोठी भविष्यवाणी!

Team India Next T20 Captain: आगामी काळात भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व कोणाकडे असेल, याबाबत शास्त्री यांनी एक मोठे भाकीत केले आहे.

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे यशस्वी नेतृत्व करताना संजूने जी परिपक्वता आणि शांतपणा दाखवला, त्याचे शास्त्रींनी विशेष कौतुक केले आहे

संजूने आपल्या कामगिरीत सातत्य आणून टीकाकारांना गप्प केले असून, तो आता एक जबाबदार खेळाडू म्हणून उदयास आला आहे.

शास्त्रींच्या मते, संजूच्या करिअरसाठी पुढची दोन ते तीन वर्षे अत्यंत महत्त्वाची असून, याच काळात तो नेतृत्वाच्या शर्यतीत आघाडीवर राहू शकतो.

हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यांच्यानंतर भारतीय टी-२० संघाची धुरा सांभाळण्याची क्षमता संजू सॅमसनमध्ये असल्याचा विश्वास रवी शास्त्रींनी व्यक्त केला आहे.