Top 10 Fastest IPL Centurions : तिलकचा मोठा पराक्रम; कोहली-सेहवागला टाकले मागे! इथं पाहा खास रेकॉर्ड

जलद शतकी खेळी करणाऱ्या टॉप १० च्या यादीत एन्ट्री मारताना त्याने विराट कोहली, मुरली विजय या दिग्गजांना मागे टाकले.

तिलक वर्मानं गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात ४५ चेंडूतील शतकी खेळीसह MI कडून संयुक्तरित्या सर्वात जलद सेंच्युरीच्या खास विक्रम आपल्या नावे केला.

जलद शतकी खेळी करणाऱ्या टॉप १० च्या यादीत एन्ट्री मारताना त्याने विराट कोहली, मुरली विजय या दिग्गजांना मागे टाकले.

आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतकी खेळीचा रेकॉर्ड हा ख्रिस गेलच्या नावे आहे. त्याने २०१३ च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाकडून पुणे वॉरियर्सविरुद्ध ३० चेंडूत शतक साजरे केले होते.

गत हंगामात वैभव सूर्यवंशीनं वयाच्या १४ व्या वर्षी राजस्थान रॉयल्सकडून खेळताना गुजरात टायटन्स विरुद्ध अवघ्या ३५ चेंडूत शतक साजरे करत क्रिकेट जगतात खास छाप सोडली होती.

युसूफ पठाण याने २०१० च्या हंगामात राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातून खेळताना मुंबई इंडियन्स विरुद्ध ३७ चेंडूत शतक झळकावले होते. गत हंगामात SRH च्या हेन्री क्लासेन याने कोलकाता विरुद्ध ३७ चेंडूत शतक साजरे करत युसूफ पठाणच्या विक्रमाची बरोबरी केली होती.

२०१३ च्या हंगामात किलर डेविड मिलरनं पंजाब किंग्सकडून खेळताना रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध ३८ चेंडूत शतक साजरे केल्याचा रेकॉर्ड आहे.

SRH चा स्फोटक बॅटर ट्रॅविस हेडनं २०२४ च्या हंगामात ३९ चेंडूत शतकी धमाका केला होता. गत हंगामात पंजाबकडून प्रियांश आर्यनंही CSK विरुद्ध एवढ्याच चेंडूत शतक साजरे केले होते.

२०२५ च्या हंगामात SRH च्या अभिषेक शर्मानं पंजाब किंग्स विरुद्ध ४० चेंडूत शतक ठोकले होते.

विल जॅक्सनं २०२४ च्या हंगामात RCB कडून खेळताना गुजरात टायटन्सविरुद्ध अवघ्या ४१ चेंडूत शतक साजरे केले होते.

२००८ च्या हंगामात ॲडम गिलख्रिस्ट याने डेक्कन चार्जर्सकडून खेळताना मुंबई इंडियन्सविरुद्ध ४२ चेंडूत शतक साजरे केले होते.

आरसीबीच्या AB डिव्हिलियर्सनं २०१६ च्या हंगामात गुजरात लायन्स विरुद्ध तर SRH कडून डेविड वॉर्नरनं २०१७ च्या हंगामात ४३ चेंडूत शतकाला गवसणी घातली होती.

तिलक वर्मा आधी २००८ च्या हंगामात सनथ जयसूर्यानं चेन्नईविरुद्ध, पंजाबकडून मयंक अग्रवालनं राजस्थान रॉयल्स विरुद्ध (२०२०), पंजाबकडून जॉनी बेयरस्टो केकेआर विरुद्ध (२०२४) तर ईशान किशन याने SRH कडून RR विरुद्ध (२०२५) ४५ चेंडूत शतकी डाव साधला आहे.

या यादीत तिलक वर्मानंतर मुरली विजय (CSK विरुद्ध RR), विराट कोहली (RCB विरुद्ध KXIPunjab) यांचा नंबर लागतो. दोघांनी अनुक्रमे ४६ आणि ४७ चेंडूतील शतकी खेळी केल्याचा रेकॉर्ड आहे. २०११ च्या हंगामात दिल्लीच्या संघाकडून डेक्कन चार्जर्स विरुद्ध ४८ चेंडूत शतक झळकावले होते.