Virat Kohli: विराट कोहलीची दहावीची मार्कशीट व्हायरल, त्याला किती मार्क्स मिळाले? पाहा

Virat Kohli Marksheet: विराट कोहलीची दहावीची मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल झाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 16:15 IST2025-06-02T16:09:58+5:302025-06-02T16:15:02+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Virat Kohli Class 10 CBSE Marksheet Goes Viral | Virat Kohli: विराट कोहलीची दहावीची मार्कशीट व्हायरल, त्याला किती मार्क्स मिळाले? पाहा

Virat Kohli: विराट कोहलीची दहावीची मार्कशीट व्हायरल, त्याला किती मार्क्स मिळाले? पाहा

नुकताच सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला. याच पार्श्वभूमीवर भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीची दहावीची मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल झाली. आयएएस जितिन यादव यांनी एक्स हँडलवरून विराटची दहावीची मार्कशीट सोशल मीडियावर शेअर केली. तर, विराट कोहली अभ्यासात किती हुशार होता? हे पाहूयात.

विराट कोहलीला दहावीत इंग्रजी, हिंदी आणि सामाजिक शास्त्रांमध्ये चांगले गुण मिळाले आहेत. गणित, विज्ञान आणि प्राथमिक आयटीमध्ये त्याला कमी गुण मिळाले आहेत. त्याला इंग्रजीमध्ये ८३ गुण (ग्रेड ए१), हिंदीमध्ये ७५ गुण (ग्रेड बी१), सामाजिक शास्त्रांमध्ये ८१ गुण (ग्रेड ए२), गणितात ५१ गुण (ग्रेड सी२) आणि आयटीमध्ये ७४ गुण (ग्रेड सी२) मिळाले आहेत.

विराटच्या मार्कशीटवर लोकांच्या प्रतिक्रिया
विराट कोहलीची दहावीची मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी कमेंट करायला सुरुवात केली. एकाने लिहिले की, "हो, कागदावरचे गुण हे फक्त आकडे आहेत, खरे रत्न म्हणजे कठोर परिश्रम आणि समर्पण." दुसऱ्याने लिहिले की, शैक्षणिक गुणांना महत्त्व आहे.  तुमच्या कठोर परिश्रमाचे आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचे मूल्यांकन करण्यासाठी गुण महत्त्वाची भूमिका बजावतात.

विराट कोहलीचे शिक्षण
विराट कोहली बारावी उत्तीर्ण आहे. त्याने विशाल भारती पब्लिक स्कूलमधून नववीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने पश्चिम विहार येथील सेव्हियर कॉन्व्हेंट स्कूलमध्ये बारावीपर्यंत शिक्षण घेतले. विराट कोहलीने त्याच्या अनेक मुलाखतींमध्ये इतिहास हा त्याचा आवडता विषय असे म्हटले. भूतकाळ जाणून घेण्याची आणि त्यातून शिकण्याची त्याला आवड होती. गणितामध्ये पास होणे हे त्याच्यासाठी मोठे आव्हान होते, असेही त्याने सांगितले.

विराट कोहलीची कारकिर्द
विराट कोहलीने १२३ कसोटी, ३०२ एकदिवसीय आणि १२५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. कसोटी क्रिकेटमध्ये विराटच्या नावावर ९ हजार २३० धावांची नोंद आहे, ज्यात ३० शतक आणि ३१ अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने ५१ शतके आणि ७४ अर्धशतकांसह १५ धावा केल्या. टी-२० क्रिकेटमध्ये विराने भारतासाठी एकूण ४ हजार १८८ धावा केल्या, ज्यात एक शतक आणि ३८ अर्धशतकांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे, नुकताच पार पडलेल्या टी-२० विश्वचषकानंतर विराटने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर कसोटी क्रिकेटलाही अलविदा केला. यापुढे विराट कोहली फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसेल.

Web Title: Virat Kohli Class 10 CBSE Marksheet Goes Viral