India vs Pakistan : इंशा-अल्लाह!, पाकिस्तान रविवारी टीम इंडियाला नक्की हरवणार; Pak PM Imran Khan

भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) यांच्यात जवळपास दोन वर्षांनंतर क्रिकेट सामना होत आहे. २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत India vs Pakistan यांच्यात सामना झाला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 11:46 PM2021-10-23T23:46:53+5:302021-10-23T23:50:57+5:30

T20 World Cup, India vs Pakistan : Pak PM Imran Khan’s very special message for Babar Azam & Co; Insha’Allah, Pakistan will definitely beat India tomorrow | India vs Pakistan : इंशा-अल्लाह!, पाकिस्तान रविवारी टीम इंडियाला नक्की हरवणार; Pak PM Imran Khan

India vs Pakistan : इंशा-अल्लाह!, पाकिस्तान रविवारी टीम इंडियाला नक्की हरवणार; Pak PM Imran Khan

Next
ठळक मुद्देपाकिस्तानला वर्ल्ड कप स्पर्धेत एकदाही भारतावर विजय मिळवता आलेला नाही. ट्वेंटी-२० स्पर्धेत भारतानं ८पैकी ६ सामने जिंकले आहेत, तर १ सामना हरला व १ बरोबरीत सुटला.  

T20 World Cup, India vs Pakistan : रविवारी सायंकाळी बरोबर ७ वाजता दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर विराट कोहली आणि बाबर आजम हे जगातील दोन अव्वल फलंदाज समोरासमोर येतील. भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) यांच्यात जवळपास दोन वर्षांनंतर क्रिकेट सामना होत आहे. २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत India vs Pakistan यांच्यात सामना झाला होता. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. त्यात पाकिस्तानचे पंतप्रधान व माजी कर्णधार इम्रान खान ( Prime Minister Imran Khan ) यांनी बाबर आजम अँड कंपनीला विशेष संदेश पाठवला आहे. पाकिस्तान यावेळेस भारताला नक्की पराभूत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

पंतप्रधान इम्रान खान यांनी बाबर आजमनच्या ( Babar Azam) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाला पाठींबा देताना वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाविरुद्धची पराभवाची मालिका यंदा खंडीत होईल, असा दावा केला आहे. ''या संघात प्रतिभावान खेळाडू आहेत आणि ते भारताला पराभूत करतील. इंशा-अल्लाह उद्या पाकिस्तान नक्की भारताला पराभूत करेल,''असे मत इम्रान खान यांनी Geo TVशी बोलताना व्यक्त केले. 

इम्रान खान यांनी या महा मुकाबल्यापूर्वी बाबर आजमशी संवाद साधला आणि यावेळी १९९२च्या वर्ल्ड कप विजयाच्या काही आठवणी त्याला सांगितल्या.''येथे येण्यापूर्वी आम्ही पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतली आणि त्यांनी त्यांचा अनुभव आमच्याशी शेअर केला. १९९२च्या वर्ल्ड कप स्पर्धेत दाखल होताना दृष्टीकोण कसा होता आणि संघाची देहबोली कशी होती, हेही त्यांनी सांगितले,''असे बाबर आजम म्हणाला.   

भारताविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्ताननं जाहीर केला संघ - Pakistan Playing XI vs India  : बाबर आजम, मोहम्मद रिझवान, फाखर जमान, मोहम्मद हाफिज, शोएब मलिक, आसीफ अली, हैदर अली, इमाद वासीम, शाबाद खान, हसन अली, शाहिन आफ्रिदी, हॅरीस रौफ ( Pakistan Playing XI vs India  : Babar Azam (C), Rizwan, Fakhar Zaman, Hafeez, Malik, Asif Ali, Haider Ali, Imad Wasim, Shadab Khan, Hasan Ali, Shaheen, Haris Rauf)
 

Web Title: T20 World Cup, India vs Pakistan : Pak PM Imran Khan’s very special message for Babar Azam & Co; Insha’Allah, Pakistan will definitely beat India tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app