Blessing Muzarabani : पाकिस्तानला ठेंगा दाखवून IPL खेळायला आला! शाहरुखच्या KKR नं संधी दिलेल्या खेळाडूवर २ वर्षांची बंदी

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नेमकं काय म्हटलंय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 16:57 IST2026-04-14T16:56:36+5:302026-04-14T16:57:36+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
PCB Bans Zimbabwe Pacer Blessing Muzarabani For Two Years For Ditching PSL For IPL 2026 | Blessing Muzarabani : पाकिस्तानला ठेंगा दाखवून IPL खेळायला आला! शाहरुखच्या KKR नं संधी दिलेल्या खेळाडूवर २ वर्षांची बंदी

Blessing Muzarabani : पाकिस्तानला ठेंगा दाखवून IPL खेळायला आला! शाहरुखच्या KKR नं संधी दिलेल्या खेळाडूवर २ वर्षांची बंदी

PCB Bans Zimbabwe Pacer Blessing Muzarabani : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून IPL खेळण्याची संधी मिळालेल्या झिम्बाब्वेच्या ब्लेसिंग मुझरबानी याच्यावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई केली आहे. मुझरबानी याने PSL च्या इस्लामाबाद यूनायटेड संघासोबत केलेला करार मोडून जगातील सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या IPL मध्ये खेळण्याला पसंती दिली होती. बांगलादेशच्या मुस्ताफिजूर रहमानच्या जागी शाहरुख खानच्या सह मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने ७५ लाख रुपयांसह त्याला आपल्या संघात सामील करून घेतले होते. आता तो दोन वर्षे PSL मध्ये खेळू शकणार नाही. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नेमकं काय म्हटलंय?

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मंगळवारी ब्लेसिंग मुझरबानी याला पीएसएलमधून 'पुढच्या दोन हंगामापर्यंत बंदी घालण्यात आल्याची माहिती दिली आहे. पीएसएलच्या व्यावसायिक तत्वांची सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचा उल्लेखही पाकिस्तान बोर्डाने केला आहे. फ्रँचायझी लीगमध्ये खेळाडूंनी व्यावसायिक दृष्टिकोन पाळणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. एखाद्या लीगमधील संघासोबत करारबद्ध असताना दुसऱ्या लीगमध्ये करारबद्ध होणे हे खेळभावनेच्या धक्का पोहचवणारे आहे, असेही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे. 

स्टेडियममध्ये Reel शूट करताना तरुणीचं मोठं नुकसान, एका चुकीनं ७० हजार गमावले, काय घडलं?

अनसोल्ड राहिल्यावर वाईल्ड कार्ड एन्ट्री, मग PSL मध्ये खेळण्यास दिला होता नकार

झिम्बाब्वेचा जलगदती गोलंदाज ब्लेसिंग मुझरबानी याने याआधी मुल्तान सुल्तान्स फ्रँचायझी संघाकडून पीएसएल जेतेपद पटकवणारा खेळाडू आहे. फेब्रुवारीमध्ये पहिल्यांदाच झालेल्या पीएसएलच्या लिलावात तो अनसोल्ड राहिला होता.  इस्लामाबाद यूनायटेड संघाने वेस्टइंडिजचा जलगती गोलंदाज शमर जोसेफला रिलीज केल्यावर त्याच्या बदली खेळाडूच्या रुपात मुझरबानी याला आपल्या संघात घेतले होते. पण स्पर्धेला सुरुवात होण्याआधी मुझरबानी याने PSL मध्ये खेळण्यास नकार दिला.

IPL मध्ये खेळल्यामुळे PSL मध्ये बंदीची कारवाई झालेला दुसरा परदेशी खेळाडू

पाकिस्तान सुपर लीगमधून माघार घेत आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूवर बंदी होणारा मुझरबानी हा दुसरा खेळाडू ठरला. याआधी गत हंगामात कॉर्बिन बॉश याने PSL ला ठेंगा दाखवत IPL मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळण्याला पसंती दिली होती.  या प्रकरणात त्याच्यावर एका वर्षांची बंदी घालण्यात आली होती. 

आयपीएलमधील कामगिरी

आयपीएल २०२६ च्या हंगामात ब्लेसिंग मुझरबानी याने कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून २ सामन्यात १०.७१ च्या इकॉनमीसह १८.७५ च्या सरासरीसह एकूण ४ विकेट्स घेतल्या आहेत. या चारही विकेट्स त्याने एकाच सामन्यात घेतल्या होत्या.

Web Title : मुज़राबानी ने PSL के ऊपर IPL को चुना, लगा प्रतिबंध; KKR को अवसर।

Web Summary : जिम्बाब्वे के ब्लेसिंग मुज़राबानी, जिन्हें KKR ने IPL के लिए चुना, को इस्लामाबाद यूनाइटेड के साथ PSL अनुबंध पर IPL को प्राथमिकता देने के लिए दो साल के PSL प्रतिबंध का सामना करना पड़ रहा है। उन्होंने 75 लाख रुपये में मुस्तफिजुर रहमान की जगह ली। इसके बाद कोर्बिन बॉश का भी ऐसा ही कदम, IPL के आकर्षण को उजागर करता है।

Web Title : Muzarabani chooses IPL over PSL, faces ban; KKR opportunity.

Web Summary : Zimbabwe's Blessing Muzarabani, picked by KKR for IPL, faces a two-year PSL ban for prioritizing IPL over his PSL contract with Islamabad United. He replaced Mustafizur Rahman for ₹75 lakh. This follows Corbin Bosch's similar move, highlighting the IPL's allure.