"हॅलो मम्मी ब्राव्हो", धोनीनं ब्राव्होच्या आईला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; चाहत्यांची जिंकली मनं

MS dhoni and dwayne bravo : आयपीएल २०२३ मधील पहिला सामना गमावल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने लखनौ सुपर जायंट्सचा पराभव करून पुनरागमन केले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 06:03 PM2023-04-04T18:03:02+5:302023-04-04T18:03:39+5:30

whatsapp join usJoin us
MS Dhoni Wishes His Teammate Dwayne Bravo's Mother On Her Birthday During IPL 2023, Watch Video   | "हॅलो मम्मी ब्राव्हो", धोनीनं ब्राव्होच्या आईला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; चाहत्यांची जिंकली मनं

"हॅलो मम्मी ब्राव्हो", धोनीनं ब्राव्होच्या आईला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; चाहत्यांची जिंकली मनं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

MS dhoni, csk । नवी दिल्ली : आयपीएल २०२३ मधील पहिला सामना गमावल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने लखनौ सुपर जायंट्सचा पराभव करून शानदार पुनरागमन केले. लखनौविरूद्ध प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने निर्धारित २० षटकांत २१७ धावांचा डोंगर उभारला होता. चेन्नईने दिलेल्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौ सुपर जांयट्सच्या संघाने २० षटकांत केवळ २०५ धावा केल्या. अखेर चेन्नईच्या संघाने विजय मिळवून लोकेश राहुलच्या संघाला पराभवाची धूळ चारली.

यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवताच चेन्नईने गुणतालिकेत आपले खाते उघडले. सीएसकेचा दिग्गज ड्वेन ब्राव्हो या हंगामात संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. अलीकडेच ब्राव्होने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये महेंद्रसिंग धोनी ब्राव्होच्या आईला ६५व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना दिसत आहे.

ड्वेन ब्राव्होच्या आईने ३ एप्रिल २०२३ रोजी आपला ६५ वा जन्मदिवस साजरा केला. चेन्नईचा कर्णधार धोनीने खास अंदाजात आपल्या सहकाऱ्याच्या आईला शुभेच्छा दिल्या, ज्याचा व्हिडीओ खुद्द ब्राव्होने शेअर केला आहे. "हॅलो मम्मी ब्राव्हो, तुम्हाला ६५व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्लीज माझ्याकडून केक घ्या. मी ब्राव्होच्या चेहऱ्याला लावेन. ऑल द वेरी बेस्ट", असे धोनी ब्राव्होने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हणत आहे. 

हा व्हिडीओ शेअर करताना ब्राव्होने लिहले, "माझ्या आईला या वर्षी तिच्या जन्मदिवशी चेन्नई सुपर किंग्ज विजयी होताना पाहायचे होते. तिला तिचे गिफ्ट मिळाले आहे कारण आम्ही जिंकलो आहोत. माझा संघ आणि माझ्या सहकाऱ्यांचे खूप-खूप अभिनंदन."

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: MS Dhoni Wishes His Teammate Dwayne Bravo's Mother On Her Birthday During IPL 2023, Watch Video  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.