Join us
Daily Top 2Weekly Top 5

MS Dhoni Retirement : मला माहित्येय तुला रडावसं वाटतंय, पण...; पत्नी साक्षीची भावनिक पोस्ट

MS Dhoni Retirement : ''तू काय म्हणालास हे लोकं विसरतील, तू काय केलंस हेही विसरतील, परंतु तू त्यांना जो क्षण अनुभवायला दिलास ते कधीच विसरणार नाही- माया अँजीलो'' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 10:46 IST

Open in App

अखेर महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. जुलै 2019 पासून धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू होती.  शनिवारी धोनीनं अचानक निवृत्ती जाहीर करून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्काच दिला.  भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) त्याला अप्रत्यक्षपणे निवृत्तीचे संकेत दिलेच होते. त्यामुळे धोनीनं त्यांना कळवण्याआधी आपल्या चाहत्यांना याबाबत थेट कळवणे पसंत केलं. धोनीच्या निवृत्तीनंतर पत्नी साक्षीनं भावनिक पोस्ट लिहिली. आपल्या आवडत्या गोष्टीचा निरोप घेताना तुझ्या डोळ्यात अश्रू आले असतील, परंतु त्यांना तू वाट मोकळी करू दिली नाहीस, अशी पोस्ट तिनं लिहिली. MS Dhoni Retirement 

''माझ्या या प्रवासात तुम्ही दिलेल्या पाठिंबा आणि प्रेमाबद्दल आभार... 7.29 मिनिटांपासून मला तुम्ही क्रिकेटमधून निवृत्त झालो असं समजा,''धोनीचं ही पोस्ट बरीच बोलकी आहे. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, वन डे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) तीनही स्पर्धा जिंकणारा तो जगातला एकमेव कर्णधार आहे. याशिवाय त्याच्या नावावर अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. 50+च्या सरासरीनं वन डे क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारा खेळाडू, वन डेत सर्वाधिक नाबाद राहणारा खेळाडू, यष्टिरक्षक म्हणून वन डेत सर्वोत्तम वैयक्तिक खेळी, वन डेत सर्वाधिक यष्टिचीत, ट्वेंटी-20 तर शुन्यावर बाद न होता सर्वाधिक काळ खेळणारा फलंदाज, कर्णधार म्हणून सर्वाधिक वन डे सामने खेळणारा, आदी अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत. MS Dhoni Retirement 

साक्षीनं लिहिलं की,''आयुष्यात जे यश मिळवलंस त्याचा तुला अभिमान वाटायला हवा. तुझ्यातील सर्वोत्तम या खेळाला तू दिलंस, त्यासाठी तुझे अभिनंदन. तुझ्या कर्तबगारीचा आणि तू एक व्यक्ती म्हणून आहेस, त्याचा मला अभिमान आहे. मला माहित्येय या क्षणी तुझ्या डोळ्यात पाणी भरून आलं असेल, परंतु तू ते रोखून धरलं असशील. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...''

''तू काय म्हणालास हे लोकं विसरतील, तू काय केलंस हेही विसरतील, परंतु तू त्यांना जो क्षण अनुभवायला दिलास ते कधीच विसरणार नाही- माया अँजीलो'' 

साक्षी आणि महेंद्रसिंग धोनी यांनी 2010मध्ये लग्न केलं आणि 2015मध्ये दोघं आई-बाबा बनले. धोनीनं निवृत्ती जाहीर केली त्या पोस्टवर साक्षीनं हृदयाचा इमोजी पोस्ट केला होता.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

मैदान सोडलय, क्रिकेट नाही! धोनीच्या नव्या कंपनीचे मुंबईत ऑफिस; कानोकान खबर नाही

वर्ल्ड क्रिकेटला हेलिकॉप्टर शॉटची कमी जाणवेल, गृहमंत्र्यांकडून 'माही'ला शुभेच्छा 

जगात काहीच अशक्य नसतं, धोनीच्या निवृत्तीनंतर खास फोटो शेअर करत शुभेच्छा 

माही जा रहा है!, क्रिकेटविश्वाला धक्का 

ओम फिनिशाय नम:... धोनीच्या निवृत्तीवर वीरू म्हणाला 'या सम हा'

...म्हणून धोनीने निवृ्त्तीसाठी निवडला १५ ऑगस्टचा दिवस, हे आहे विशेष कारण

 

लोकांनी तुझं यश पाहिलं, मी तुझ्यातला माणूस पाहिला आहे, विराट कोहलीचं भावनिक ट्विट

महेंद्रसिंग धोनीच्या पदार्पण अन् निवृत्तीनं जुळवून आणला अजब योगायोग!

महेंद्र सिंह धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती 

 मै पल दो पल का शायर हूँ...! निवृत्ती जाहीर करताना MS Dhoniनं दिला 'खास' संदेश!

 'कॅप्टन कूल' धोनीनं अखेर 'टफ' कॉल घेतला; संघाचं हित समजून निवृत्ती स्वीकारली

अशी कामगिरी करणारा धोनी जगातील एकमेव कर्णधार

 महेंद्रसिंग धोनीचे 'हे' दहा विक्रम मोडणे अशक्य!

महेंद्रसिंग धोनीनं वर्ल्ड कप जिंकून टीम इंडियाच्या नावावर नोंदवला होता अजरामर विक्रम!

 

 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ