MS Dhoni Retirement: Every cricketer has to end his journey one day, but... Virat kohli get emotional  | MS Dhoni Retirement: लोकांनी तुझं यश पाहिलं, मी तुझ्यातला माणूस पाहिला आहे, विराट कोहलीचं भावनिक ट्विट

MS Dhoni Retirement: लोकांनी तुझं यश पाहिलं, मी तुझ्यातला माणूस पाहिला आहे, विराट कोहलीचं भावनिक ट्विट

नवी दिल्ली  - धडाकेबाज फलंदाजी आणि कुशल यष्टीरक्षणांमुळे भारतीय संघाला अनेक सामन्यांत विजय मिळवून देणारा आणि आपल्या कुशल नेतृत्वावर देशाला टी-२० विश्वचषक, आयसीसी क्रिकेट विश्वचषक आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी या तीन मोठ्या स्पर्धा जिंकुन देणारा कॅप्टन कुल महेंद्र सिंग धोनीने आज आपल्या कारकिर्दीमधील सर्वात मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

MS Dhoni Retirement: महेंद्रसिंग धोनीनं वर्ल्ड कप जिंकून टीम इंडियाच्या नावावर नोंदवला होता अजरामर विक्रम!

धोनीने  90 कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करताना 38.09 च्या सरासरीने 6 शतके व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. तर 350 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने  50.57 च्या धडाकेबाज सरासरीने 10 हजार 773 धावा फटकावल्या. त्यामध्ये  10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. तर ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये माहीने 98 सामन्यांत 1617 धावा केल्या. फलंदाजीसोबतच धोनीने यष्टीमागूनही त्याने भारतीय संघाला भरभरून योगदान दिले. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, तर वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत.

महेंद्र सिंह धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती 

MS Dhoni Retirement: मै पल दो पल का शायर हूँ...! निवृत्ती जाहीर करताना MS Dhoniनं दिला 'खास' संदेश!

MS Dhoni Retirement: 'कॅप्टन कूल' धोनीनं अखेर 'टफ' कॉल घेतला; संघाचं हित समजून निवृत्ती स्वीकारली

MS Dhoni Retirement: अशी कामगिरी करणारा धोनी जगातील एकमेव कर्णधार

 महेंद्रसिंग धोनीचे 'हे' दहा विक्रम मोडणे अशक्य!

धोनीच्या निवृत्तीनंतर विराट कोहलीनं ट्विट केलं की,''एक दिवस प्रत्येक क्रिकेटपटूला प्रवास थांबवाव लागतो, परंतु तुम्ही ज्याला जवळून ओळखता त्यानं हा निवृत्तीचा निर्णय घेतल्यावर मन भरून येतं. तू या देशासाठी जे केलं आहेत, ते प्रत्येकाच्या हृदयात कायम राहिल''


 तो पुढे म्हणाला,''तुझ्याकडून मिळालेला मान आणि प्रेम हे मी नेहमी माझ्याजवळ राहील. लोकांनी तुझं यश पाहिलं आहे मी तुझ्यातला माणूस पाहिला आहे. धन्यवाद'' 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: MS Dhoni Retirement: Every cricketer has to end his journey one day, but... Virat kohli get emotional 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.