MS Dhoni Retire : Thanks a lot for ur love and support throughout, mahi give special massage watch video | MS Dhoni Retirement: मै पल दो पल का शायर हूँ...! निवृत्ती जाहीर करताना MS Dhoniनं दिला 'खास' संदेश!

MS Dhoni Retirement: मै पल दो पल का शायर हूँ...! निवृत्ती जाहीर करताना MS Dhoniनं दिला 'खास' संदेश!

अखेर महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. जुलै 2019 पासून धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू होती. पण, धोनी किमान 2020 चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळेल आणि मानानं निवृत्ती घेईल, असा सर्वांचा अंदाज होता. पण, त्या चर्चाच राहिल्या. शनिवारी धोनीनं अचानक निवृत्ती जाहीर करून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्काच दिला. भारताला अनेक अविश्वसनीय विजय मिळवून देणाऱ्या धोनीनं मैदानाबाहेर घेतलेली निवृत्ती अनेकांना पटलेली नाही. त्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) त्याला अप्रत्यक्षपणे निवृत्तीचे संकेत दिलेच होते. त्यामुळे धोनीनं त्यांना कळवण्याआधी आपल्या चाहत्यांना याबाबत थेट कळवणे पसंत केलं. MS Dhoni Retirement:

''माझ्या या प्रवासात तुम्ही दिलेल्या पाठिंबा आणि प्रेमाबद्दल आभार... 7.29 मिनिटांपासून मला तुम्ही क्रिकेटमधून निवृत्त झालो असं समजा,''धोनीचं ही पोस्ट बरीच बोलकी आहे. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, वन डे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) तीनही स्पर्धा जिंकणारा तो जगातला एकमेव कर्णधार आहे. याशिवाय त्याच्या नावावर अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. 50+च्या सरासरीनं वन डे क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारा खेळाडू, वन डेत सर्वाधिक नाबाद राहणारा खेळाडू, यष्टिरक्षक म्हणून वन डेत सर्वोत्तम वैयक्तिक खेळी, वन डेत सर्वाधिक यष्टिचीत, ट्वेंटी-20 तर शुन्यावर बाद न होता सर्वाधिक काळ खेळणारा फलंदाज, कर्णधार म्हणून सर्वाधिक वन डे सामने खेळणारा, आदी अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत.  MS Dhoni Retirement:

धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत.4

धोनीनं आज निवृत्ती जाहीर करताना त्याच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा व्हिडीओ पोस्ट केला. मै पल दो पल का शायर हूँ... या गाण्यातून त्यानं अनेकांना एक खास संदेश दिला आहे.

पाहा व्हिडीओ...

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: MS Dhoni Retire : Thanks a lot for ur love and support throughout, mahi give special massage watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.