जगात काहीच अशक्य नसतं, धोनीच्या निवृत्तीनंतर खास फोटो शेअर करत शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 07:47 AM2020-08-16T07:47:30+5:302020-08-16T07:48:43+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर महेंद्रसिंगने जगाला आपल्या खेळातून एक संदेश दिल्याचे म्हटले आहे. धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगातातील प्रवास म्हणजे नथिंग इज इम्पॉसिबल असल्याचं सुप्रिया यांनी सूचवलं आहे

Nothing is impossible in the world, a special photo shared by Supriya Sule after Dhoni's retirement | जगात काहीच अशक्य नसतं, धोनीच्या निवृत्तीनंतर खास फोटो शेअर करत शुभेच्छा

जगात काहीच अशक्य नसतं, धोनीच्या निवृत्तीनंतर खास फोटो शेअर करत शुभेच्छा

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर महेंद्रसिंगने जगाला आपल्या खेळातून एक संदेश दिल्याचे म्हटले आहे. धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगातातील प्रवास म्हणजे नथिंग इज इम्पॉसिबल असल्याचं सुप्रिया यांनी सूचवलं आह

मुंबई - टीम इंडियाचमा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. जुलै 2019 पासून धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू होती.  शनिवारी धोनीनं अचानक निवृत्ती जाहीर करून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्काच दिला. भारताला अनेक अविश्वसनीय विजय मिळवून देणाऱ्या धोनीनं मैदानाबाहेर घेतलेली निवृत्ती अनेकांना पटलेली नाही. त्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) त्याला अप्रत्यक्षपणे निवृत्तीचे संकेत दिलेच होते. त्यामुळे धोनीनं त्यांना कळवण्याआधी आपल्या चाहत्यांना याबाबत थेट कळवणे पसंत केलं. धोनीच्या निवृत्तीनंतर जगभरातील चाहत्यांनी नाराजी व्यक्त करताना, धोनीच्या आठवणी जागवल्या आहेत. राजकीय नेत्यांनीही धोनीच्या कारकिर्दीचं कौतुक केलंय. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर महेंद्रसिंगने जगाला आपल्या खेळातून एक संदेश दिल्याचे म्हटले आहे. धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगातातील प्रवास म्हणजे नथिंग इज इम्पॉसिबल असल्याचं सुप्रिया यांनी सूचवलं आहे. ''भारतीय क्रिकेटला विश्वविजेता बनविणारा कर्णधार म्हणून तुझं योगदान ग्रेट आहेच, पण त्याहीपेक्षा जगात काहीही अशक्य नसतं असा संदेश तुझ्या खेळीतून मिळतो. क्रिकेटच्या विश्वातच नव्हे तर लाखो भारतीयांच्या हृदयात तु अढळपद मिळविले आहेस. तुला पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा'', असं ट्विट सुप्रिया यांनी केलं आहे. धोनीच्या निवृत्तीनंतर अनेक राजकीय दिग्गजांनी त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

''माझ्या या प्रवासात तुम्ही दिलेल्या पाठिंबा आणि प्रेमाबद्दल आभार... 7.29 मिनिटांपासून मला तुम्ही क्रिकेटमधून निवृत्त झालो असं समजा,'' धोनीची ही पोस्ट बरीच बोलकी आहे. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, वन डे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) तीनही स्पर्धा जिंकणारा तो जगातला एकमेव कर्णधार आहे. याशिवाय त्याच्या नावावर अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. 50+च्या सरासरीनं वन डे क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारा खेळाडू, वन डेत सर्वाधिक नाबाद राहणारा खेळाडू, यष्टिरक्षक म्हणून वन डेत सर्वोत्तम वैयक्तिक खेळी, वन डेत सर्वाधिक यष्टिचीत, ट्वेंटी-20 तर शुन्यावर बाद न होता सर्वाधिक काळ खेळणारा फलंदाज, कर्णधार म्हणून सर्वाधिक वन डे सामने खेळणारा, आदी अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत.  

धोनीच्या निवृत्तीनंतर क्रिकेट जगतातूनही त्याच्या खेळीचं आणि कारकिर्दीचं कौतुक करण्यात येतंय. टीम इंडियाचा धडाकेबाजी माजी फलंदाज विरेंदर सेहवागनं ट्विट केलं की,''महेंद्रसिंग धोनीसारखा खेळाडू मिळणे, अशक्य आहे. ना कोई है, ना कोई था, ना कोई होगा, एमएस के जैसा. खेळाडू येतील आणि जातील, परंतु तुझ्यासारखा शांत माणून होणे नाही. त्याची लोकांना एवढा जवळचा वाटायचा की जणू तो त्यांच्या कुटूंबातील सदस्य आहे. ओम फिनिशाय नमः''

Web Title: Nothing is impossible in the world, a special photo shared by Supriya Sule after Dhoni's retirement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.