माही जा रहा है!, क्रिकेटविश्वाला धक्का

गेल्या एक वर्षापासून धोनीच्या निवृत्तीबाबत अनेक चर्चा रंगत होत्या. अखेर स्वत: धोनीनेच या चर्चांना पूर्णविराम दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 02:11 AM2020-08-16T02:11:32+5:302020-08-16T06:52:21+5:30

whatsapp join usJoin us
Mahi is going !, pushing the cricket world | माही जा रहा है!, क्रिकेटविश्वाला धक्का

माही जा रहा है!, क्रिकेटविश्वाला धक्का

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : समस्त क्रिकेटप्रेमींना उत्सुकता होती ती यंदाच्या आयपीएलची. कारण, तब्बल एक वर्षानंतर विश्वविजेता माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची चौफेर फटकेबाजी पाहण्यास मिळणार होती. मात्र शनिवारी रात्री अचानकपणे धोनीने सोशल मीडियावरून आपल्या निवृत्तीची घोषणा केली आणि सर्वांनाच धक्का बसला. धोनी आयपीएल खेळणार असल्याचाच मोठा दिलासा क्रिकेटप्रेमींना मिळाला. दखल घेण्याची बाब म्हणजे धोनीच्या निवृत्तीनंतर काही वेळाचे स्टार क्रिकेटपटू सुरेश रैना यानेही आपल्या निवृत्तीची घोषणा केली.
गेल्या एक वर्षापासून धोनीच्या निवृत्तीबाबत अनेक चर्चा रंगत होत्या. अखेर स्वत: धोनीनेच या चर्चांना पूर्णविराम दिला. विशेष म्हणजे शुक्रवारीच धोनी चेन्नईला आपल्या चेन्नई सुपरकिंग्ज (सीएसके) संघासोबत जुळला होता आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आपल्या निवृत्तीची घोषणा केली. अत्यंत कल्पकतेने नेतृत्व करण्याचे असलेले गुण आणि अखेरच्या क्षणापर्यंत सामन्यात रंग भरण्याच्या कौशल्यामुळे धोनीने क्रिकेटप्रेमींच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. त्यामुळे दिग्गज खेळाडूंमध्ये गणना होणाºया धोनीच्या या निवृत्तीच्या घोषणेनंतर क्रिकेटविश्वातील एका पर्वाचाच जणू अंत झाला. धोनीने इन्स्टाग्रामवर संदेश लिहिला की, ‘आतापर्यंत तुम्ही दिलेले प्रेम आणि पाठिंबा यासाठी मी तुमचा आभारी आहे. संध्याकाळी ७ वाजून २९ मिनिटांपासून मला तुम्ही निवृत्त समजा.’
> एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाच ते सात क्रमांकांवर फलंदाजी करणे मोठी जबाबदारी असते. मात्र धोनीने ही जबाबदारी यशस्वीपणे सांभाळताना ५० हून अधिकची सरासरी राखली. त्याने एकदिवसीय सामन्यात 10,773 धावा केल्या.
>पल दो पल का शायर...
निवृत्ती जाहीर करताना धोनीने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी एक व्हिडिओ अपलोड केला. यावेळी त्याने आपला आवडता गायक किशोर कुमार यांनी गायलेल्या ‘मै पल दो पल का शाहर हू...’ या गाण्यातून सर्वांना संदेश दिला. या गाण्यासहच धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र गाणं जरी ‘मै पल दो पल का..’ असले, तरी धोनीने क्रिकेटविश्वावर कायस्वरुपी छाप पाडली आहे. रांचीसारख्या छोट्या शहरातून पुढे येऊन बाहेरच्या झगमगत्या दुनियेत आपला वेगळा ठसा उमटविणाºया धोनीने युवांना स्वप्न पाहण्यास आणि ते पूर्ण करण्याचा विश्वास दिला. कसोटी क्रिकेटमध्ये १०० सामने खेळणे प्रत्येकालाच जमत नाही. हे यशही धोनीच्या अवाक्यात आले होते. मात्र त्याने कधीही आकडेवारीला महत्त्व दिले नाही आणि ऐन आॅस्टेÑलिया दौरा सुरु असतानाच त्याने अचानकपणे कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यावेळी १०० कसोटीचा पल्ला गाठण्यापासून तो केवळ १० सामन्यांनी दूर होता. यानंतर पाच वर्षे आणि ७ महिन्यांनी त्याने देशाच्या ७४व्या स्वातंत्र्यदिनीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. धोनीने कधीही स्वत:वर दडपण आणले नाही.
>असाही योगायोग...
धोनीने २००४ साली बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आपल्या पहिल्याच सामन्यात तो शून्यावर धावबाद झाला होता. दखल घेण्याची बाब म्हणजे आपल्या अखेरच्या सामन्यातही तो धावबादच झाला. गेल्याच वर्षी झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध धोनी धावबाद झाला होता. मात्र त्यावेळी त्याने ५० धावा केल्या होत्या. हा सामना धोनीचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला.
>आयपीएलमधील ‘थाला’
आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून चेन्नई सुपरकिंग्जचे नेतृत्व करणाºया धोनीला क्रिकेटप्रेमी प्रेमाने ‘थाला’ म्हणतात. त्याने आयपीएलमध्येही आपली विशेष छाप पाडताना सीएसकेला तीनवेळा जेतेपद मिळवून दिले आहे. विशेष म्हणजे सलग दोन वर्षे आयपीएलचे जेतेपद जिंकणारा तो एकमेव कर्णधारही आहे. खूप कमी क्रिकेटपटू असे आहेत ज्यांची महानता आकडेवारीवरुन सिद्ध करता येणार नाही. धोनी त्यापैकीच एक. चतुरस्त्र कर्णधार, सामन्याच्या परिस्थितीनुसार खेळ करणे आणि चपळ क्षेत्ररक्षण याजोरावर त्याने क्रिकेटविश्वाला आपली भुरळ पाडली. धाडसी निर्णय घेत धोनीने आपली नेतृत्त्वक्षमता सिद्ध केली. या जोरावरच त्याने २००७ साली पहिल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील अंतिम षटक जोगिंदर शर्मासारख्या नवख्या गोलंदाजा टाकण्यास दिले. त्याने दाखवलेला विश्वास जोगिंदरनेही सार्थ ठरविला आणि भारताने पहिला टी-२० विश्वचषक उंचावला. यानंतर त्याच्याच नेतृत्त्वात भारताने आपल्याच यजमानपदाखाली झालेला २०११ सालचा विश्वचषक पटकावला होता. धोनीने गेल्यावर्षी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतासाठी अखेरचा सामना खेळला होता. जबरदस्त वेगात धावण्यासाठी ओळखला जाणारा धोनी त्या सामन्यात मोक्याच्यावेळी धावबाद झाला होता. हा क्षण भारताच्या पराभवात निर्णायक ठरला होता. आपल्या अखेरच्या डावात त्याने ५० धावांची खेळी केली होती.
रांचीसारख्या लहान शहरातून पुढे आलेल्या धोनीने आपल्या शानदार आणि अलौकिक गुणवत्तेच्या जोरावर क्रिकेटविश्वातील दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत स्थान निर्माण केले. भारतासाठी त्याने ३५० एकदिवसीय सामने, ९० कसोटी सामने आणि ९८ टी-२० सामने खेळले आहेत.
>एकमेव कर्णधार!
टी-२० विश्वचषक स्पर्धा, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि ५० षटकांची विश्वचषक स्पर्धा या आयसीसीच्या मुख्य स्पर्धा आहेत. या तिन्ही स्पर्धांचे विजेतेपद जिंकणारा धोनी एकमेव कर्णधार आहे
हे विशेष. या शिवाय त्याच्या नेतृत्त्वात भारताने कसोटी क्रमवारीतही
अव्वल स्थान पटकावले होते.

>धोनी किमया!
आयसीसीच्या तिन्ही स्पर्धा जिंकणारा एकमेव कर्णधार. धोनीच्या नेतृत्त्वात भारताने २००७ मध्ये टी-२० विश्वचषक, २०११ मध्ये वन-डे विश्वचषक आणि २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली.
कर्णधार म्हणून धोनीने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये मिळून सर्वाधिक ३३२ सामन्यांत भारताचे नेतृत्त्व केले. आॅस्टेÑलियाच्या रिकी पाँटिंगने ३२४ सामन्यांत देशाचे नेतृत्त्व केले.
कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय मिळवणारा भारतीय कर्णधार. धोनीने तिन्ही प्रकारात मिळून ३३२ सामन्यांत १७८ विजय मिळवले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०० सामन्यांत नेतृत्त्व करण्याचा विक्रमही धोनीच्या नावावर आहे.
कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा काढणारा भारतीय. त्याने कर्णधार म्हणून २०० एकदिवसीय सामन्यांत ५३.५६च्या सरासरीने ६,६४१ धावा केल्या आहेत. या विक्रमात आॅस्टेÑलियाचा रिकी पाँटिंग अव्वल आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये धोनी सर्वाधिक २०४ षटकार ठोकणारा कर्णधार आहे.
एकदिवसीय सामन्यात यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून सर्वोच्च वैयक्तिक खेळी करण्याचा विक्रमही धोनीच्याच नावावर आहे. त्याने २००५ साली श्रीलंकेविरुद्ध १४५ चेंडूंत १५ चौकार व १० षटकांरांसह १८३ धावा कुटल्या होत्या.
विश्वचषक अंतिम सामन्यात षटकार ठोकून जेतेपद निश्चित करणारा धोनी क्रिकेटविश्वातील एकमेव फलंदाज.
धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक यष्टीचीत केले आहेत. त्याने ५३८ सामन्यांत एकूण १९५ यष्टीचीत केले आहेत. यामध्ये श्रीलंकेचा कुमार संगाकारा (१३९) दुसऱ्या स्थानी आहे.
धोनी भारताचा सर्वात यशस्वी यष्टीरक्षक आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८२९ बळी घेतले असून त्यामध्ये १९५ यष्टीचीत आणि ६३४ झेल आहेत. कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात धोनी सातत्याने अपयशी ठरला. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्य चर्चांनी जोर धरला होता. त्यातच विश्वचषक स्पर्धेनंतर जवळपास एक वर्ष तो क्रिकेट मैदानापासून दूर राहिल्याने धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा मोठ्या प्रमाणात रंगत होत्या.


>रैनानेही दिला धक्का
महेंद्रसिंग धोनीच्या पाठोपाठ काही वेळानेच
स्टार क्रिकेटपटू सुरेश रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे क्रिकेटपटूंना दुहेरी धक्का बसला. रैनाने २०१८ साली अखेरचा एकदिवसीय आणि टी-२० सामना खेळला होता. तसेच, २०१५ साली त्याने अखेरचा कसोटी सामना खेळला होता. ‘धोनी तुझ्यासोबत खेळण्याचा आनंद वेगळाच होता. त्यामुळेच तू निवृत्ती घेतल्यानंतर मीही तुझ्या या प्रवासात येण्याचा निर्णय घेत आहे. टीम इंडिया धन्यवाद. जय हिंद.’
आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात शतक करणारा
रैना भारताचा पहिला फलंदाज आहे. तसेच क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत शतक करण्याचा पहिला मानही रैनानेच मिळविला आहे. रैनाने भरवशाच्या फलंदाजासह एक उपयुक्त फिरकी गोलंदाज म्हणूनही छाप पाडली.
>मी तुझ्यातला माणूस पाहिला...
एक दिवस प्रत्येकाचा प्रवास संपतो. परंतु, ज्याला तुम्ही जवळून ओळखता, त्याने हा निवृत्तीचा निर्णय घेतल्यावर मन भरुन येतं. तू या देशासाठी जे काही केल आहेस, ते प्रत्येकाच्या हृदयात कायम राहिल. तुझ्याकडून मिळालेला मान आणि प्रेम हे नेहमी माझ्याजवळ राहील. लोकांनी तुझं यश पाहिलं आहे, मी तुझ्यातला माणूस पाहिला आहे. धन्यवाद.
- विराट कोहली
भारतीय क्रिकेटसाठी तू मोलाचे योगदान दिले आहेस. तुझ्यासोबतीने जिंकलेले २०११ सालचे विश्वविजेतेपद माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण आहे. तुला आणि तुझ्या कुटुंबाला तुझ्या दुसऱ्या इनिंगसाठी शुभेच्छा.
- सचिन तेंडुलकर
तुझ्यासाठी शब्दांची कमतरता भासेल. संयम, मार्गदर्शन आणि सातत्याने दिलेला पाठिंबा यासाठी माही भाई तुझे आभार. स्वत:ची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तू नेहमीच इतरांसाठी पेरणादायी राहशील.
- लोकेश राहुल, फलंदाज
खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तुझ्यासोबत डेÑसिंग रुमचा अनुभव घेणे आणि तुला पाहणे ही अभिमानाची बाब आहे. भारताच्या एका दिग्गज क्रिकेटपटूला माझा सलाम. आनंदी रहा.
- रवी शास्त्री, प्रशिक्षक - टीम इंडिया
जबरदस्त आंतरराष्ट्रीय कारकिर्दीसाठी धोनी आणि रैनाचे अभिनंदन. धोनी तुझा शांत स्वभाव आणि कर्णधार म्हणून पाडलेली छाप कायम लक्षात राहील. तुझ्यासोबत खेळण्याची संधी मिळणे अभिमानास्पद आहे. रैनाचाही मला अभिमान आहे. तुम्हा दोघांना तुमच्या दुसºया इनिंगसाठी खूप शुभेच्छा!
- अनिल कुंबळे, माजी क्रिकेटपटू

Web Title: Mahi is going !, pushing the cricket world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.