Join us

IPL 2020 : दुबईत पोहोचताच विराट कोहलीनं पोस्ट केला फोटो; युजवेंद्र चहलनं सुरू केली मस्ती

IPL 2020: RCBनं त्यांच्या टीमचा दुबई प्रवासाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला, परंतु त्यात कर्णधार विराट कोहली दिसत नव्हता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 22:25 IST

Open in App
ठळक मुद्देMI, KKR, CSK, RR, RCB आणि KXIP असे सहा संघ दुबईत दाखलहैदराबाद आणि दिल्ली हे दोन संघ शनिवारी दुबईसाठी प्रवास करणारदुबईत पोहोचताच सर्व खेळाडूंना 6 दिवस क्वारंटाईन होणं गरजेचं

इंडियन प्रीमिअर लीगसाठी ( आयपीएल 2020) सर्व संघ संयुक्त अरब अमिरातीत ( यूएई) दाखल होत आहेत. कोलकाता नाइट रायडर्स, किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्सचे खेळाडू गुरुवारी यूएईत दाखल झाले. त्यानंतर शुक्रवारी मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स संघ दुबईत पोहोचले. RCBनं त्यांच्या टीमचा दुबई प्रवासाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला, परंतु त्यात कर्णधार विराट कोहली दिसत नसल्यानं सर्वांना आश्चर्य वाटले. अनेकांनी कोहली कुठेय, असा सवालही केला. पण, कोहली दुबईत पोहोचला असून त्यानं स्वतः दुबईतील हॉटेलमधील एक फोटो पोस्ट करून त्याची माहिती दिली.

IPL 2020 : माशी शिंकली; मुंबई इंडियन्सला धक्का देणारी बातमी समोर आली 

बीसीसीआयच्या नियमानुसार आता खेळाडूंना सहा दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. त्यात तेथे त्यांची कोरोना चाचणी होणार आहे आणि त्यानंतर त्यांना मैदानावर परतण्याची परवानगी मिळणार आहे. खेळाडूंचा रिपोर्ट निगेटिव्ह आला, तरच त्याला अन्य खेळाडूंसोबत सरावाची परवानगी मिळणार आहे. यूएईत दाखल होणारा RCB हा सहावा संघ ठरला आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद शनिवारी यूएईत दाखल होणार आहेत. यंदाची आयपीएल स्पर्धा दुबईत होणार असून 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत थरार रंगणार आहे.  विराटनं शेअर केला दुबईत पोहोचल्याचा फोटो...  त्यावर युजवेंद्र चहलनं घेतली फिरकी. विराटच्या फोटोवर चहलनं कमेंट केली की,''एकाच हॉटेलमधून हॅलो भय्या.''

अन्य महत्त्वाच्या बातम्या

शिक्कामोर्तब : रोहित शर्मासह पाच जणांना 'खेल रत्न' पुरस्कार; हिटमॅन ठरला चौथा क्रिकेटपटू 

अंबाती रायुडू असता तर टीम इंडियानं वर्ल्ड कप जिंकला असता; निवृत्तीनंतर सुरेश रैनाची फटकेबाजी

CPL 2020 : सनरायझर्स हैदराबादच्या रशीद खानचा ट्वेंटी-20त वर्ल्ड रेकॉर्ड

IPL 2020 पूर्वी कोलकाता नाइट रायडर्सच्या खेळाडूची CPL मध्ये तुफान फटकेबाजी!

रोहित शर्मा पत्नी अन् मुलीसह झाला यूएईसाठी रवाना; RCB, DC, CSKनंही घेतली भरारी

Video: खतरनाक अपघात; बाईक्सचे झाले तुकडे तुकडे; रेसिंग सुरू असताना रायडरचा तोल गेला अन्... 

IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीची 'मसल्स' पॉवर; आयपीएलमधील अशक्यप्राय विक्रम नावावर!

टॅग्स :आयपीएल 2020रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहलीयुजवेंद्र चहलसंयुक्त अरब अमिराती