IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीची 'मसल' पॉवर; आयपीएलमधील अशक्यप्राय विक्रम नावावर!

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं 15 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. धोनीचा हा निर्णय सर्वांना धक्का देणारा असला तरी वयाचं बंधन लक्षात घेता, तो योग्यच वाटतो.

महेंद्रसिंग धोनी आता टीम इंडियाच्या ब्लू जर्सीत दिसणार नसला तरी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) तो चेन्नई सुपर किंग्सच्या पिवळ्या जर्सीत फटकेबाजी करताना दिसणार आहे.

वन डे, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसीच्या तीनही प्रमुख स्पर्धा जिंकणारा जगातला एकमेव कर्णधार आहे धोनी.

आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत टीम इंडियानं अव्वल स्थान मिळवले, ते धोनीच्या नेतृत्वाखालीच. 40 वर्षांत ऑस्ट्रेलियाला कसोटीत व्हाईटवॉश कुणी दिला नव्हता, तो धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं विक्रम नोंदवला.

आयपीएलमध्येही धोनीच्या नावावर असा पराक्रम आहे, की जो मोडणे सध्यातरी कुणाला शक्य नाही. जगभरात महेंद्रसिंग धोनीला फिनिशर म्हणून ओळखले जाते.

आयपीएलमध्येही डेथ ओव्हरमध्ये सर्वाधिक 2206 धावांचा विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आहे. त्यानं 190.50च्या स्ट्राईक रेटनं शेवटच्या चार षटकांत धावा चोपल्या आहेत.

दुसऱ्या क्रमांकावर असलेला फलंदाज आणि धोनी यांच्यात जवळपास 1000 धावांचा फरक आहे. मुंबई इंडियन्सचा किरॉन पोलार्ड 178.71 स्ट्राईक रेटनं 1276 धावा केल्या आहेत.

या विक्रमात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा ( 199.64 स्ट्राईक रेट अन् 1136 धावा) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ( 234.65 स्टाईक रेट अन् 1063 धावा) अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानावर आहेत.

याशिवाय अखेरच्या चार षटकांत सर्वाधिक 136 षटकारांचा विक्रमही धोनीच्या नावावर आहे. त्यानंतर पोलार्ड 92 षटकारांसह दुसऱ्या आणि डिव्हिलियर्स ( 83), रोहित ( 78), आंद्रे रसेल यांचा क्रमांक येतो.