शिक्कामोर्तब : रोहित शर्मासह पाच जणांना 'खेल रत्न' पुरस्कार; हिटमॅन ठरला चौथा क्रिकेटपटू 

२०१६ मध्ये स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, जिम्नॅस्ट दीपा करमाकर, नेमबाज जितू राय आणि महिला मल्ल साक्षी मलिक यांना एकाचवेळी खेलरत्नने गौरविण्यात आले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 05:10 PM2020-08-21T17:10:41+5:302020-08-21T17:39:16+5:30

whatsapp join usJoin us
Cricketer Rohit Sharma, Mariappan Thangavelu, Manika Batra, Vinesh Phogat & Rani to get Rajiv Gandhi Khel Ratna Award | शिक्कामोर्तब : रोहित शर्मासह पाच जणांना 'खेल रत्न' पुरस्कार; हिटमॅन ठरला चौथा क्रिकेटपटू 

शिक्कामोर्तब : रोहित शर्मासह पाच जणांना 'खेल रत्न' पुरस्कार; हिटमॅन ठरला चौथा क्रिकेटपटू 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देखेलरत्नसाठी शिफारस झालेली राणी पहिली महिला हॉकीपटू आहे. वेगवान गोलंदाज ईशांत शर्मासह २7 खेळाडूंची यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस झाली

क्रिकेटपटू रोहित शर्मा, पॅरा अॅथलेटिक्स मरिअप्पन थंगवेलू, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, कुस्तीपटू विनेश फोगाट आणि हॉकीपटू राणी यांना राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार मिळणार आहे. क्रीडा मंत्रालयानं शुक्रवारी त्याची अधिकृत घोषणा केली. क्रीडा मंत्रालयाच्या इतिहासात एकाचवेळी पाच खेळाडूंना खेलरत्नने गौरविण्याची ही पहिली वेळ असेल. यापूर्वी २०१६ मध्ये स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, जिम्नॅस्ट दीपा करमाकर, नेमबाज जितू राय आणि महिला मल्ल साक्षी मलिक यांना एकाचवेळी खेलरत्नने गौरविण्यात आले होते. Rajiv Gandhi Khel Ratna Award


खेलरत्नसाठी शिफारस झालेली राणी पहिली महिला हॉकीपटू आहे. या आधी पुरुष हॉकीपटूंमध्ये धनराज पिल्ले (२०००) व सरदारसिंग (२०१७) यांना हा गौरव प्राप्त झाला होता. १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१९ ला कालावधीत राणीने भारतीय संघाचे नेतृत्व करताना २०१७ ला महिला आशिया चषक जिंकून दिला. २०१८ च्या आशिया चषकात संघाने रौप्य पदक जिंकले तसेच २०१९च्या एफआयएच ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत निर्णायक गोल करीत तिने संघाला टोकियो ऑलिम्पिकची पात्रता गाठून दिली होती. विनेशने २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धा तसेच आशियाई स्पर्धेत सुवर्ण व २०१९ च्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपचे कांस्य पदक जिंकले होते. Rajiv Gandhi Khel Ratna Award

टेबल टेनिसपटू मनिका बत्राने २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेत एकेरीत सुवर्ण व आशियाई स्पर्धेत कांस्य पदक जिंकले होते. थंगवेलूने रिओ पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीचे सुवर्ण पदक जिंकले. वेगवान गोलंदाज ईशांत शर्मासह २7 खेळाडूंची यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस झाली.  राहुल आवारे (कुस्ती) मधुरिका पाटकर (टेबल टेनिस) आणि दिव्यांग जलतरणपटू सुयश जाधव या महाराष्ट्राच्या खेळाडूंचीही अर्जुन पुरस्कार मिळणार आहे.  Rajiv Gandhi Khel Ratna Award

रोहित शर्माची खेलरत्नसाठी निवड झाल्यास हा मानाचा पुरस्कार मिळवणारा तो चौथा क्रिकेटपटू ठरणार आहे. याआधी सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांना खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. सचिनला १९९८ साली, धोनीला २००७ तर विराटला २०१८ साली हा पुरस्कार मिळाला होता. २०१९ विश्वचषकात रोहित शर्माने पाच शतके झळकावत केलेली बहारदार खेळी पाहता बीसीसीआयने त्याचे नाव खेलरत्नसाठी दिले होते. Rajiv Gandhi Khel Ratna Award

अन्य महत्त्वाच्या बातम्या

CPL 2020 : सनरायझर्स हैदराबादच्या रशीद खानचा ट्वेंटी-20त वर्ल्ड रेकॉर्ड

IPL 2020 पूर्वी कोलकाता नाइट रायडर्सच्या खेळाडूची CPL मध्ये तुफान फटकेबाजी!

रोहित शर्मा पत्नी अन् मुलीसह झाला यूएईसाठी रवाना; RCB, DC, CSKनंही घेतली भरारी

Video: खतरनाक अपघात; बाईक्सचे झाले तुकडे तुकडे; रेसिंग सुरू असताना रायडरचा तोल गेला अन्... 

IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीची 'मसल्स' पॉवर; आयपीएलमधील अशक्यप्राय विक्रम नावावर!

 

Web Title: Cricketer Rohit Sharma, Mariappan Thangavelu, Manika Batra, Vinesh Phogat & Rani to get Rajiv Gandhi Khel Ratna Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.