अंबाती रायुडू असता तर टीम इंडियानं वर्ल्ड कप जिंकला असता; निवृत्तीनंतर सुरेश रैनाची फटकेबाजी

इंग्लंडमध्ये झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचे नक्की काय चुकले, याचे उत्तर अजूनही कुणाला सापडलेलं नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 05:40 PM2020-08-21T17:40:55+5:302020-08-21T17:54:29+5:30

whatsapp join usJoin us
If Ambati Rayudu was part of India's squad for 2019 World Cup, we would have won: Suresh Raina | अंबाती रायुडू असता तर टीम इंडियानं वर्ल्ड कप जिंकला असता; निवृत्तीनंतर सुरेश रैनाची फटकेबाजी

अंबाती रायुडू असता तर टीम इंडियानं वर्ल्ड कप जिंकला असता; निवृत्तीनंतर सुरेश रैनाची फटकेबाजी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्दे चौथ्या क्रमांकासाठी अंबाती रायुडूची दोन वर्ष चाचपणी केली अन् वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर त्याला डच्चू दिला.तत्कालिन प्रमुख एमएसके प्रसाद यांनी शंकरची निवड ही 3D फॅक्टरवर केल्याचे जाहीर केले.

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी चौथ्या क्रमांकासाठी निवडलेल्या विजय शंकरवरून चांगले रणकंद पेटले होते. चौथ्या क्रमांकासाठी अंबाती रायुडूची दोन वर्ष चाचपणी केली अन् वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर त्याला डच्चू दिला. निवड समितीचा हा निर्णय सर्वांना आश्चर्यात टाकणारा होता. त्यातवर तत्कालिन प्रमुख एमएसके प्रसाद यांनी शंकरची निवड ही 3D फॅक्टरवर केल्याचे जाहीर केले. पण, हा थ्रीडी फॅक्टर चाललाच नाही. टीम इंडियाला उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून हार पत्करावी लागली.

शिक्कामोर्तब : रोहित शर्मासह पाच जणांना 'खेल रत्न' पुरस्कार; हिटमॅन ठरला चौथा क्रिकेटपटू 

नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या सुरेश रैनानं वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील संघात अंबाती रायुडूला खेळवायला हवं होतं असं स्पष्ट मत मांडलं आहे. तो म्हणाला,''वर्ल्ड कपसाठी चौथ्या क्रमांकासाठी मला अंबाती रायुडू संघात हवा होता, त्यानं त्यासाठी खूप मेहनत घेतली होती. जवळपास दीड वर्ष तो त्या स्थानावर खेळत होता. त्यानं चांगली कामगिरी केली होती, पण तो वर्ल्ड कपच्या संघात नव्हता. 2018च्या दौऱ्यावर रायुडू फिटनेस टेस्ट नापास झाला होता. त्याला फिटनेस टेस्ट पास करता आली नाही म्हणून माझी निवड झाली, ही गोष्ट मला खात होती.''

''चौथ्या क्रमांकासाठी तो योग्य होता. वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघाचा तो सदस्य असता, तर आपण नक्कीच स्पर्धा जिंकलो असतो. तो सर्वोत्तम पर्याय होता आणि चेन्नई सुपर किंग्ससाठी तो त्याच ताकदीनं खेळतो,''असेही रैना म्हणाला.  

अन् भारताचे आव्हान संपुष्टात आले
वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य  न्यूझीलंडने 8 बाद 239 धावा उभ्या केल्या प्रत्युत्तरात भारताला 49.3 षटकांत सर्वबाद 221 धावाच करता आल्या. पावसामुळे हा सामना दोन दिवस रंगला आणि भारतासमोर 240 धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते. धोनी आणि रवींद्र जडेजा यांनी भारताच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या होत्या, परंतु धोनी धावबाद झाला अन् भारताचे आव्हानही संपुष्टात आले. धोनीनं त्या सामन्यात 50, तर जडेजानं 77 धावा केल्या.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

CPL 2020 : सनरायझर्स हैदराबादच्या रशीद खानचा ट्वेंटी-20त वर्ल्ड रेकॉर्ड

IPL 2020 पूर्वी कोलकाता नाइट रायडर्सच्या खेळाडूची CPL मध्ये तुफान फटकेबाजी!

रोहित शर्मा पत्नी अन् मुलीसह झाला यूएईसाठी रवाना; RCB, DC, CSKनंही घेतली भरारी

Video: खतरनाक अपघात; बाईक्सचे झाले तुकडे तुकडे; रेसिंग सुरू असताना रायडरचा तोल गेला अन्... 

IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीची 'मसल्स' पॉवर; आयपीएलमधील अशक्यप्राय विक्रम नावावर!

Web Title: If Ambati Rayudu was part of India's squad for 2019 World Cup, we would have won: Suresh Raina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.