'गुलाबी ऑंखे...' गाण्यावर पत्नीसोबत थिरकले कपिल देव; पाहा अफलातून डान्स

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल यांचा डान्स करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 03:17 PM2024-01-10T15:17:41+5:302024-01-10T15:19:50+5:30

whatsapp join usJoin us
Indian Cricketer kapil dev dancing with her wife on gulabi aankhaein song video goes vial on social media  | 'गुलाबी ऑंखे...' गाण्यावर पत्नीसोबत थिरकले कपिल देव; पाहा अफलातून डान्स

'गुलाबी ऑंखे...' गाण्यावर पत्नीसोबत थिरकले कपिल देव; पाहा अफलातून डान्स

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Kapil Dev Dance video : आपल्या भेदक गोलंदाजीने प्रतिस्पर्धीं फलंदाजांना भांबावून टाकणारे  कपिल देव यांचा भन्नाट डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर चाहत्यांच्या समोर आलाय. कपिल देव पत्नीसोबत रोमॅंटिक अंदाजात  गुलाबी ऑंखे या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. या व्हायरल व्हिडीओवर क्रिकेटप्रेमींनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

क्रिकेट विश्वात आपल्या परखड भाष्य शैलीने तसेच हटके अंदाजाचे व्यक्तिमत्व म्हणून कपिल देव यांची ख्याती आहे. पण, त्यांचा दुसरा अंदाज पाहून सारे चकित झाले आहेत. ६५ व्या वादिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीमध्ये कपिल देव त्यांच्या पत्नीसोबत थिरकताना दिसले. त्यांनी ६ जानेवारी रोजी  वयाची ६५ वर्षे पूर्ण केली. या जोडप्याचा गुलाबी ऑंखे या गाण्यावर डान्स पाहून चाहते प्रचंड खुश झाले आहेत. 

पाहा व्हिडीओ -

साल १९८३ मध्ये भारतीय संघाने बलाढ्य अशा वेस्ट इंडिज संघावर आपलं वर्चस्व दाखवलं. इंडियन टीमने भारतीय कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वखाली वेस्ट इंडिज संघाला पराभवाची धूर चारली. दुबळा, कमकुवत संघ म्हणून भारतीय टीमकडे बघणाऱ्यांचा अंदाज कपिल देव यांनी त्याकाळी फोल ठरवला. कपिल देव यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने सर्वांनाच धक्का दिला देत नवा इतिहास रचला होता. 

Web Title: Indian Cricketer kapil dev dancing with her wife on gulabi aankhaein song video goes vial on social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.