मोदींचे नाणे घासूनपुसून गुळगुळीत झालं, आता ते बाजारात चालत नाही: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 03:27 PM2024-04-13T15:27:38+5:302024-04-13T17:13:05+5:30

देश संकटात असताना जे एकत्र राहत नाही त्यांची देश नोंद ठेवतात.

Modi's name has been rubbed smooth, now it is not working in the market: Sanjay Raut | मोदींचे नाणे घासूनपुसून गुळगुळीत झालं, आता ते बाजारात चालत नाही: संजय राऊत

मोदींचे नाणे घासूनपुसून गुळगुळीत झालं, आता ते बाजारात चालत नाही: संजय राऊत

छत्रपती संभाजीनगर: नरेंद्र मोदी यांचे नाणे घासून पुसून गुळगुळीत झाले आहे, आता ते बाजारात चालत नाही, अशी खरमरीत टीका खासदार संजय राऊत यांनी केली. श्रावणात मटण हा काय प्रचाराचा मुद्दा आहे का? प्रचाराचा स्तर एवढा खाली आणत असतील तर त्यांना पराभवाची भीती आहे, असे दावाही राऊत यांनी केला. ते छत्रपती संभाजीनगरात पत्रकारांशी बोलत होते.

शिंदेसेनेचे उमेदवार भाजप दिल्लीत ठरवतो यावरून त्यांची महाराष्ट्रात काय लायकी आहे हे समजते. औरंगाबाद, नाशिक, ठाणे जागा लढवण्यावरून वाद सुरू असून शिवसेनेच्या विरोधात महायुतीला उमेदवार मिळत नाही. तर दुसरीकडे मराठवाड्यात शिवसेनेचे ठाकरे गटाचे चारही उमेदवार विजयी होत आहेत. तसेच जालना आणि लातूरमध्ये बदल होणार. पंकजा मुंडे यांना निवडणूक सामान्य नाही. आदर्श टॉवर महाविकास आघाडीच्या धडकेने ढासळेल असा टोलाही अशोक चव्हाण यांचे नाव न घेता खासदार संजय राऊत यांनी लगावला.

राजकारण आम्हाला ही कळते
प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत राहावे म्हणून अतोनात प्रयत्न केला, प्रेमाने हात जोडले. आम्ही त्यांना ६ जागा दिल्या. नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण यांनी एकत्र येण्याची विनंती केली होती. पण आम्ही त्यांच्या विषयी कायम आदर ठेवू. देश संकटात असताना जे एकत्र राहत नाही त्यांची देश नोंद ठेवतात. प्रकाश आंबेडकर यांचे अनेकांशी वाद सुरू आहेत. त्यांच्यासाठी सदैव आमचे दरवाजे उघडे आहेत, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

Web Title: Modi's name has been rubbed smooth, now it is not working in the market: Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.