KL Rahul, Athiya Shetty : राहुलचा हात हाती घेत स्टेजवर आली आथिया; पहिल्यांदाच शेट्टी कुटुंबीयांसोबत दिसला भारतीय फलंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 08:48 AM2021-12-03T08:48:38+5:302021-12-03T08:49:26+5:30

KL Rahul, Athiya Shetty : तडप या चित्रपटाच्या ग्रँड प्रीमिअरदरम्यान शेट्टी कुटुंबीयांसोबत भारताचा फलंदाज केएल राहुल हादेखील सहभागी झाला होता. अथिया, राहुल एकमेंकांचा हात धरत स्टेजवर आले होते.

tadap athiya shetty kl rahul seen together publicly for the first time attend the premiere of ahan shettys debut film | KL Rahul, Athiya Shetty : राहुलचा हात हाती घेत स्टेजवर आली आथिया; पहिल्यांदाच शेट्टी कुटुंबीयांसोबत दिसला भारतीय फलंदाज

KL Rahul, Athiya Shetty : राहुलचा हात हाती घेत स्टेजवर आली आथिया; पहिल्यांदाच शेट्टी कुटुंबीयांसोबत दिसला भारतीय फलंदाज

googlenewsNext

KL Rahul, Athiya Shetty : बॉलिवूडचा अभिनेता सुनिल शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी कायम आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेचा विषय ठरत असते. अनेकदा ती भारतीय संघाचा फलंदाज केएल राहुलसह आपले फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर करत असते. इतकंच नाही तर केएल राहुलदेखील तिच्यासोबत फोटो शेअर करत असतो. काही वेळा अथिया राहुलसोबत क्रिकेटच्या दौऱ्यांवरदेखील दिसली होती.

यापूर्वी ही जोडी केवळ सोशल मीडियावरच एकत्र दिसत होती. परंतु पहिल्यांदाच ही जोडी सार्वजनिकरित्या एकमेकांचा हात धरत समोर आली. अथिया शेट्टीचा भाऊ अहान शेट्टीचा डेब्यू चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान दोघं एकत्र दिसून आले. इतकंच नाही तर त्यांनी फोटोग्राफर्सना पोझंही दिले. चित्रपटाच्या प्रीमिअरसाठी संपूर्ण शेट्टी कुटुंब हजर होतं. विशेष म्हणजे केएल राहुलदेखील फॅमिली फोटोमध्ये अथियासोबत पोझ देताना दिसला. तर प्रीमिअरमध्ये किम शर्मादेखील टेनिस चॅम्पिअन लिएंडर पेससोबत एकत्र होती.


याशिवाय या कार्यक्रमात जॅकी श्रॉफ, सोहेन खान यांनीदेखील हजेरी लावली होती. तर अहान शेट्टी हा आपली गर्लफ्रेन्ड तानिया श्रॉफसह एकत्र दिसला. सोशल मीडियावर अहानच्या चित्रपटाचा प्रचार करणाऱ्या सुनिल शेट्टीनंदेखील आपल्या मुलासह फोटो क्लिक केले. "मी अनेक वर्षांपासून प्रशिक्षण घेत होतो. माझ्या वडिलांचे मित्र आणि सहकारी असलेले निर्माते आणि दिग्दर्शकांना मी सेटवर भेटत होतो. त्यांच्याकडून मला काम मिळावं ही अपेक्षा नव्हती. हे सर्व सोपं नव्हतं. साजिद सरांनी माझा एक डान्स व्हिडीओ पाहिला आणि मला फोन केला. त्यांनी काही ऑडिशन्स पाठवण्यास सांगितल्या. हा चित्रपट मला मिळाला त्यात माझे वडिल अभिनेते असल्याचं देणंघेणंही नाही. माझ्या टॅलेंटमुळे मला हा चित्रपट मिळाला," असं अहान शेट्टीनं यापूर्वी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं.

Web Title: tadap athiya shetty kl rahul seen together publicly for the first time attend the premiere of ahan shettys debut film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.