रंग माझा वेगळा: कार्तिकसोबत खेळणारा चिमुकला आहे तरी कोण? Video होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 02:30 PM2021-10-20T14:30:00+5:302021-10-20T14:30:00+5:30

Aashutosh Gokhale: आशुतोषचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याच्यासोबत असलेला हा चिमुकला नेमका कोण आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

rang maza vegala fame actor kartik aka Aashutosh Gokhale share his nephew abir video | रंग माझा वेगळा: कार्तिकसोबत खेळणारा चिमुकला आहे तरी कोण? Video होतोय व्हायरल

रंग माझा वेगळा: कार्तिकसोबत खेळणारा चिमुकला आहे तरी कोण? Video होतोय व्हायरल

Next
ठळक मुद्देअलिकडेच कार्तिकने इन्स्टाग्रामवर एका लहान मुलासोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे.

छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे 'रंग माझा वेगळा'(rang maza vegla). या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे (reshma shinde) हिने दिपाची भूमिका साकारली आहे. तर अभिनेता आशुतोष गोखले(Aashutosh Gokhale) कार्तिकच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. सध्या ही मालिका रंजक वळणावर पोहोचली असून कार्तिक आणि दिपा लवकरच एकमेकांच्या समोरासमोर येणार आहेत. त्यामुळे या मालिकेविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. यामध्येच सध्या कार्तिकचा म्हणजेच आशुतोष त्याच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत येत आहे. 

अलिकडेच कार्तिकने इन्स्टाग्रामवर एका लहान मुलासोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो एका चिमुकल्यासोबच खेळतांना दिसत आहे. आशुतोषचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याच्यासोबत असलेला हा चिमुकला नेमका कोण आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. त्याचसोबत त्याने दिलेलं 'आमचा नवीन खेळ' हे कॅप्शनही चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

रंग माझा वेगळा: जयवंत वाडकरांच्या लेकीला मिळाली होती दिपाची भूमिका; 'या' कारणामुळे नाकारली ऑफर

दरम्यान, या पोस्टमध्येच आशुतोषने हा चिमुकला नेमका कोण आहे याचा खुलासा केला आहे. व्हिडीओमध्ये दिसणारा हा लहानगा आशुतोषचा भाचा असून त्याचं नाव अबीर (Abir) आहे. आशुतोष आणि अबीर यांच्यात खूप सुंदर बॉण्डिंग असल्याचं या व्हिडीओवरुन दिसून येतं. इतकंच नाही तर अनेकदा आशुतोष त्याच्यासोबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो. 
 

Web Title: rang maza vegala fame actor kartik aka Aashutosh Gokhale share his nephew abir video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app