ठळक मुद्देमोहोब्बते या चित्रपटातील किम शर्मा सोबत तो जवळजवळ चार वर्षं नात्यात होता. पण या नात्याला युवराजच्या आईचा विरोध असल्याने त्यांनी ब्रेकअप केले असे म्हटले जाते.

भारताच्या 2011च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा शिल्पकार युवराज सिंगने निवृत्ती घेण्याचे नुकतेच जाहीर केले. मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्यानं ही घोषणा केली. ही घोषणा करताना युवी भावूक झाला होता... 17 वर्षांच्या कारकिर्दीत मी अनेक चढउतार पाहिले. क्रिकेटने मला सर्व काही दिलं आणि म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे, असे तो म्हणाला. युवराज सिंगचे आयुष्य हे एखाद्या रोलर कोस्टर राईटसारखे आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरले नाही. कॅन्सरसारख्या आजारावर मात करत तो मैदानावर परतला होता.  

युवराजच्या क्रिकेट करियरसोबतच त्याचे खाजगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले. अभिनेत्री हॅझल कीचसोबत त्याचे नोव्हेंबर 2015 मध्ये लग्न झाले. त्याचे त्याआधी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडण्यात आले होते.

मोहोब्बते या चित्रपटातील किम शर्मा सोबत तो जवळजवळ चार वर्षं नात्यात होता. पण या नात्याला युवराजच्या आईचा विरोध असल्याने त्यांनी ब्रेकअप केले असे म्हटले जाते.

किंग्स इलेव्हन पंजाब या आयपीएल टीमची मालकिण आणि अभिनेत्री प्रिती झिंटा आणि युवराजच्या अफेअरची देखील चांगलीच चर्चा झाली होती. पण या केवळ अफवा असल्याचे प्रितीने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले होते. 

भारताने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर युवराजच्या कामगिरीचे सगळ्यांनी कौतुक केले होते. त्याच्या महिला चाहत्यांमध्ये देखील प्रचंड वाढ झाली होती. त्याचदरम्यान अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि त्याच्या नात्याविषयी मीडियात चर्चा सुरू झाली आहे. ती अनेकवेळा क्रिकेटच्या मॅचना हजेरी लावत असे. तसेच तिने युवराजसाठी वाढदिवसाची पार्टीदेखील दिली होती. पण काहीच दिवसांत या चर्चांना विराम मिळाला. 

दीपिका पादुकोणसोबत ब्रेकअप झाल्यानंतर रिया सेनसोबत हातात हात घालून युवराजला फिरताना पाहाण्यात आले होते. पण या दोघांनाही त्यांच्यात काहीही नसल्याचे म्हटले होते.

मिनिषा लाम्बा आणि युवराज सिंग यांच्या किसिंगचा व्हिडिओ 2011 मध्ये ऑनलाईन लीक झाला होती. या व्हिडिओची चांगलीच चर्चा झाल्यानंतर या व्हिडिओत असणारी मुलगी मी नसून माझ्यासारखी दिसणारी मुलगी असल्याचे मिनिषाने सांगितले होते. 


Web Title: As Yuvraj Singh Announces Retirement, a Look At His Alleged Love Affairs With Bollywood Actresses
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.