आता संजू बाबा राजकारणात एन्ट्री करणार? घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट, फोटो शेअर करत लिहिलं असं कॅप्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 21:53 IST2026-02-23T21:51:44+5:302026-02-23T21:53:28+5:30
संजय दत्तच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तो लवकरच 'धुरंधर २', 'द गुड महाराजा' आणि 'केडी: द डेव्हिल' यांसारख्या अनेक मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. तो शेवटचा 'धुरंधर' चित्रपटात एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला होता.

आता संजू बाबा राजकारणात एन्ट्री करणार? घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट, फोटो शेअर करत लिहिलं असं कॅप्शन
बॉलीवूड आणि राजकारण यांचे नेहमीच जवळचे नाते राहत आले आहे. अनेक कलाकार राजकारणातही आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच, अनेक जण बड्या नेत्यांसोबतचे आपले फोटोही शेअर करताना दिसतात. असाच एक फोटो आता हिंदी चित्रपटसृष्टीचा 'बाबा' अर्थात संजय दत्तने शेअर केला आहे. त्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लखनौमध्ये भेट घेतली. या भेटीचा फोटो संजय दत्तने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो काही मिनिटांतच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
कुठे घेतली भेट? -
या भेटीदरम्यान संजय दत्त पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा आणि गळ्यात भगवा पटका अशा पेहरावात दिसत आहे. मुख्यमंत्र्यांशी हस्तांदोलन करतानाचा हा फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या फटोमध्ये संजय दत्त आणि योगी आदित्यनाथ यांच्या चेहऱ्यावर हास्यही दिसत आहे. हा फोटो शेअर करताना संजय दत्तने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "माझे भाग्य आहे की मला लखनौमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटण्याची संधी मिळाली. हा एक अत्यंत सुखद अनुभव होता. या संभाषणाबद्दल आणि आपल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद."
अशा येताहेत नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया -
संजय दत्तने हा फोटो पोस्ट करताच चाहत्यांनी त्यावर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. एका युजरने लिहेले, "जेव्हा रील बाबा खऱ्या बाबांना भेटला", आणखी एकाने लिहिले, "मला वाटतेय हा (संजू बाबा) युपीच्या निवडणूक मैदानात तर उतरणार नाही?" याशिवाय इतरही अनेक जण या फोटो वर कमेंट करत आहेत.