ठळक मुद्देया गाण्याच्या शुटिंगदरम्यान मला 102- डिग्री इतका ताप होता तरी मी शूटिंगला गेले आणि ते दृश्य पूर्ण केले. त्या काळी सर्वात उत्साही म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजेश खन्ना यांच्यासोबत ते दृश्य शूट करायचे होते.

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सुपर डान्सर 3 हा शो सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांचा अत्यंत आवडता लहान मुलांचा डान्स रिअ‍ॅलिटी शो बनला आहे. यातील लहान मुलांच्या अद्भुत नृत्य कौशल्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे आणि त्यामुळे तो टीआरपीमध्ये सतत आघाडीवर असतो. शिवाय दर आठवड्याला या कार्यक्रमात लोकप्रिय कलाकार स्पर्धकांचे मनोबल वाढवण्यासाठी उपस्थिती लावत असतात. त्यामुळे हा कार्यक्रम आणखीनच मनोरंजक होतो. 

येत्या आठवड्यात या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री बिंदू, अरुणा इराणी आणि झीनत अमान हजेरी लावणार आहेत. या तिघी स्पर्धक आणि परीक्षक शिल्पा शेट्टी, अनुराग बासू आणि गीता कपूर यांच्यासोबत मौज मस्ती करताना दिसणार आहेत. तसेच सुपर डान्सरमधील स्पर्धक या भागात ऐंशी-नव्वदच्या दशकातील गाण्यांवर परफॉर्मन्स सादर करणार असून आपल्या परफॉर्मन्समधून उपस्थितांचे मन जिंकणार आहेत.

या कार्यक्रमात बिंदू यांनी 1970 मधील ‘दुश्मन’ चित्रपटातील राजेश खन्ना यांच्यासोबत चित्रित झालेल्या एका विशिष्ट नृत्य दृश्याबद्दल सांगितले. या कार्यक्रमातील स्पर्धक अक्षित भंडारी आणि त्याचा गुरू विवेक चाचरे यांनी ‘दुश्मन’ चित्रपटातील ‘वादा तेरा वादा’ या गाण्यावर केलेले सादरीकरण पाहून बिंदू यांना या गाण्याच्या शूटिंगची आठवण झाली. त्यांनी सांगितले, “या गाण्याच्या शुटिंगदरम्यान मला 102- डिग्री इतका ताप होता तरी मी शूटिंगला गेले आणि ते दृश्य पूर्ण केले. त्या काळी सर्वात उत्साही म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजेश खन्ना यांच्यासोबत ते दृश्य शूट करायचे होते. मी सेटवर पोहचले तेव्हा तिथे इतकी वेगळी ऊर्जा आणि उत्साह सळसळत होता की मी आजारी होते हे विसरूनच गेले आणि त्या भरात मी परफॉर्म करत गेले. या चित्रीकरणाच्याआधी सेटवर एका डॉक्टरला बोलावण्यात आले होते. त्याने मला इंजेक्शन दिले असल्याने मी काहीच तासात बरे झाले. 

सुपर डान्सर हा कार्यक्रम आता फिनालेच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे. त्यामुळे चांगल्या डान्सरला मत देऊन त्याला ‘डान्स का कल’ हा किताब जिंकण्यात मदत करण्याची जबाबदारी आता प्रेक्षकांवर आली आहे. प्रेक्षक सोनीलिव्ह अ‍ॅप डाऊनलोड करून आपल्या आवडत्या स्पर्धकाला सुपर 5 मध्ये प्रवेश करण्यासाठी मत देऊ शकतात.


Web Title: When dance made Bindu forget 102 fever revealed in Super Dancer 3
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.