हे आहे टायगर श्रॉफचे खरे नाव... त्याच्या या वाईट सवयीमुळे पडले त्याला टायगर हे नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 12:53 PM2020-03-02T12:53:29+5:302020-03-02T13:00:55+5:30

टायगरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर त्याच्या अभिनयाइतकीच त्याच्या नावाची चर्चा झाली होती.

What Is His Real Name of Tiger Shroff And How He Got Called 'Tiger'? PSC | हे आहे टायगर श्रॉफचे खरे नाव... त्याच्या या वाईट सवयीमुळे पडले त्याला टायगर हे नाव

हे आहे टायगर श्रॉफचे खरे नाव... त्याच्या या वाईट सवयीमुळे पडले त्याला टायगर हे नाव

googlenewsNext
ठळक मुद्देटायगरचे खरे नाव जय हेमंत श्रॉफ असे आहे. टायगरचे टायगर हे नाव पडण्यामागे त्याची लहानपणीची एक सवय कारणीभूत आहे. होय, लहानपणी टायगरला चावायची सवय होती. तो सगळ्यांना चावत सुटायचा.

‘हिरोपंती’ या चित्रपटातून डेब्यू करणारा टायगर श्रॉफ आता बॉलिवूडचा अ‍ॅक्शन हिरो म्हणून ओळखला जातो. लाखों तरुणी त्याच्यावर फिदा आहेत. आज टायगरचा वाढदिवस असून अभिनेता जॅकी श्रॉफचा टायगर हा मुलगा आहे. डॅड जॅकी श्रॉफ यांच्या पावलावर पाऊल टाकत टायगर बॉलिवूडमध्ये आला आणि त्याने खूपच कमी काळात बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.

टायगरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर त्याच्या अभिनयाइतकीच त्याच्या नावाची चर्चा झाली होती. कारण त्याचे नाव खूपच वेगळे असल्याची सुरुवातीपासूनच चर्चा रंगली होती. टायगरचे खरे नाव जय हेमंत श्रॉफ असे आहे. टायगरचे वडील अभिनेता जॅकीचा लहान भाऊ जय हेमंत याच्या नावावरून त्याचे नाव ठेवण्यात आले होते. जॅकी श्रॉफ यांनी खूप लहान वयात या भावाला गमवले होते. त्याचमुळे आपल्या भावाची आठवण कायम ठेवण्यासाठी आपल्या मुलाचे नाव त्याने हेमंत ठेवले होते. हेमंत हे नाव बदलून टायगर हे नाव ठेवण्यामागे एक रंजक किस्सा आहे. 

टायगरचे टायगर हे नाव पडण्यामागे त्याची लहानपणीची एक सवय कारणीभूत आहे. होय, लहानपणी टायगरला चावायची सवय होती. तो सगळ्यांना चावत सुटायचा. तो सतत चावायचा. या सवयीसाठी त्याच्या आईने त्याला अनेकदा मारले होते. तो जसा जसा मोठा झाला, तशी तशी त्याची ही सवय अधिकच वाढत गेली. घरी येणाऱ्या पाहुण्यांनाही तो चावायचा. त्यामुळे जॅकी श्रॉफने त्याचे नाव टायगर असे ठेवले.

टायगरची लहान बहीण कृष्णा आणि टायगरमध्ये अनेकवेळा भांडणं व्हायची. एकदा दोघांमध्ये इतके जोरदार भांडण झाले की, टायगरने कृष्णाचा चावा घेतला. हा चावा इतका जोरदार होता की तिला डॉक्टरकडे न्यावे लागले. यामुळे टायगरची आई इतकी संतापली की, तिने त्याला मिरची खायला लावली. पुढे पुढे तो जेव्हाही चावायचा ती त्याला मिरची खायला लावायची. मग मात्र टायगर घाबरू लागला आणि हळूहळू त्याची ती सवय मोडली. पण त्याचे टायगर हे नाव मात्र कायम राहिले.

Web Title: What Is His Real Name of Tiger Shroff And How He Got Called 'Tiger'? PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.