घरबसल्या व्यायाम कसा करायचा, कोणता डाएट शरीरास योग्य हे सांगतेय उर्वशी रौतेला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 06:00 AM2020-03-22T06:00:00+5:302020-03-22T06:00:02+5:30

सध्या जीम बंद असल्याने घरबसल्या व्यायाम कसा करायचा हे उर्वशीने सोशल मीडियाच्या मार्फत तिच्या चाहत्यांना सांगितले आहे.

Urvashi Rautela's Yoga Video At Time Of Self-quarantine Is Just The Right Inspiration PSC | घरबसल्या व्यायाम कसा करायचा, कोणता डाएट शरीरास योग्य हे सांगतेय उर्वशी रौतेला

घरबसल्या व्यायाम कसा करायचा, कोणता डाएट शरीरास योग्य हे सांगतेय उर्वशी रौतेला

googlenewsNext
ठळक मुद्देअभिनेत्री उर्वशी रौतेलाने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत कसरत आणि स्ट्रेचिंग घरबसल्या कसे करायचे हे सांगितले आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून पहिल्याच दिवशी २० लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून शाळा-कॉलेज बंद केले जात आहेत. तसेच सिनेमांचे शूटिंग आणि प्रमोशनही काही काळ थांबवण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर भारतातील अनेक राज्यात मॉल्स, थिएटर बंद करण्यात आले आहेत. ऑफिसेसमध्ये देखील अनेक ठिकाणी वर्क फ्रॉम होम देण्यात आले आहे. लोकांनी घरातून कमीत कमी बाहेर पडावे. गरज असेल तरच सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय वापरावा असे सरकार गेल्या काही दिवसांपासून मीडियाच्या माध्यमातून लोकांना सांगत आहे. 

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी सध्या कोरोनामुळे घरातच आहेत. लोकांनी देखील घराच्या बाहेर पडू नयेत यासाठी ते आवाहन करताना दिसत आहेत. सध्या प्रत्येकाने निरोगी राहाणे गरजेचे असून शरीराची इम्यून सिस्टिम देखील वाढवणे गरजेचे आहे.

कोरोना व्हायरसचा फैलाव टाळण्यासाठी शहरातील सगळ्या जीम तात्पुरत्या बंद झाल्या असून कॅटरिना कैफ, मलायका अरोरा, जॅकलिन फर्नांडिज, उर्वशी रौतेला यांसारख्या फिटनेस फ्रीक अभिनेत्री घरातच व्यायाम करताना दिसत आहेत. एवढेच नव्हे तर आपल्या चाहत्यांनाही देखील घरात राहून व्यायाम कसा करावा हे त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून शिकवण्यास सुरुवात देखील केली आहे. अभिनेत्री उर्वशी रौतेलाने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत  कसरत आणि स्ट्रेचिंग घरबसल्या कसे करायचे हे सांगितले आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून पहिल्याच दिवशी २० लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

योग आणि व्यायाम करण्यासाठी आपण खुर्ची, सोफाचा आधार घेऊन शकतो. घरात बसल्या बसल्या स्क्वाट्स, पुशअप्स, ट्रायसेप डिप्स इत्यादी व्यायाम करू शकतो असे ती या व्हिडिओत ती सांगताना दिसत आहे. तसेच आपली इम्यून सिस्टिम चांगली ठेवण्यासाठी फळे, पालेभाज्या आणि ज्यूस पिऊन स्वतःला तंदरुस्त ठेवावे असा देखील सल्ला ती तिच्या चाहत्यांना देत आहे. 

Web Title: Urvashi Rautela's Yoga Video At Time Of Self-quarantine Is Just The Right Inspiration PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.