Tokyo Olympics: ...म्हणून वेटलिफ्टर मीराबाई चानूची भेट घेतल्यानंतर सोशल मीडियावर ट्रोल होतोय सलमान खान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 09:56 AM2021-08-12T09:56:02+5:302021-08-12T10:01:18+5:30

Salman khan meets mirabai chanu: टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक जिंकून देणारी वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने नुकतीच बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची भेट घेतली होती.

Tokyo Olympics: ... so Salman Khan became a troll on social media after meeting weightlifter Mirabai Chanu | Tokyo Olympics: ...म्हणून वेटलिफ्टर मीराबाई चानूची भेट घेतल्यानंतर सोशल मीडियावर ट्रोल होतोय सलमान खान

Tokyo Olympics: ...म्हणून वेटलिफ्टर मीराबाई चानूची भेट घेतल्यानंतर सोशल मीडियावर ट्रोल होतोय सलमान खान

googlenewsNext

मुंबई - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक जिंकून देणारी वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने नुकतीच बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची भेट घेतली होती. (Salman khan meets mirabai chanu)त्यानंतर सलमानने मीराबाई चानूसोबतचा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता. (Tokyo Olympics)मात्र हा फोटो शेअर केल्यावर नेटीझन्सनी सलमानला ट्रोल करण्यास सुरुवात केली. शेअर केलेल्या या फोटोमध्ये नेटिझन्सना एक अशी गोष्ट दिसली ज्याच्याशी सलमानचे खूप जुने नाते आहे, त्यावरून नेटिझन्सनी सलमानवर निशाणा साधला. (Salman Khan became a troll on social media after meeting weightlifter Mirabai Chanu)

शेअर केल्या गेलेल्या फोटोमध्ये सलमान खानसोबतच्या फोटोमध्ये मीराबाई चानू हसताना दिसत आहे. सलमानने हा फोटो शेअर करताना खाली रौप्य पदक विजेत्या मीराबाई चानूला शुभेच्छा, तुझ्यासोबत खूप चांगली भेट झाली, तुला सर्वकाळासाठी खूप खूप शुभेच्छा, अशी कॅप्शन दिली होती. दरम्यान, शेअर करण्यात आलेल्या या फोटोमध्ये सलमान खानच्या गळ्यात एक मणिपुरी स्कार्फ दिसत आहे. हा स्कार्फ मीराबाईने चानूने सलमानला गिफ्ट केला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या स्कार्फवर काळ्या हरिणाचे चित्र दिसत आहे. ते पाहताच नेटिझन्सनी या हरणावरून सलमानला वेगवेगळ्या कमेंट्स करून ट्रोल करण्यास सुरुवात केली. 

काळ्या हरणामुळे सलमानला किती अडचणींचा सामना करावा लागला होता, हे सर्वांनाचा माहिती आहे. याबाबत एका युझरने लिहिले की, भाईच्या शॉलवर हरीण, दुसऱ्याने लिहिले की, या फोटोमध्ये काय पाहिले. तिसऱ्याने लिहिले की, आता यावर खूप मिम्स बनणार, एका अन्य युझरने लिहिले की, हरिण डेव्हिलच्या मागे. डेव्हिल हरणाच्या मागे... टू मच फन.

मीराबाई चानू हिने भारोत्तोलनामध्ये भारताला रौप्यपदक जिंकून दिले होते. त्याबरोबरच तिने भारोत्तोलनामध्ये पदकासाठीचा भारताचा २१ वर्षांचा दुष्काळ संपवला होता. २००० च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्नाम मल्लेश्वरी हिने जिंकलेल्या कांस्यपदकानंतर आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला भारोत्तोलनामध्ये पदक जिंकून दिले होते.  दरम्यान, रौप्यपदक विजेत्या मीराबाई चानू हिच्या जीवनावर आता एक मणिपुरी चित्रपट बनणार आहे.  

Web Title: Tokyo Olympics: ... so Salman Khan became a troll on social media after meeting weightlifter Mirabai Chanu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.