Tokyo Olympic, Neeraj Chopra :नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावून रचला इतिहास, बॉलिवूडकरांनी व्यक्त केला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 07:20 PM2021-08-07T19:20:46+5:302021-08-07T19:21:53+5:30

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने शनिवारी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याच्या ऐतिहासिक कामगिरीवर बॉलिवूडचे कलाकार कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

Tokyo Olympics, Neeraj Chopra: Neeraj Chopra made history by winning gold medal in Olympics, Bollywoodkars express happiness | Tokyo Olympic, Neeraj Chopra :नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावून रचला इतिहास, बॉलिवूडकरांनी व्यक्त केला आनंद

Tokyo Olympic, Neeraj Chopra :नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावून रचला इतिहास, बॉलिवूडकरांनी व्यक्त केला आनंद

Next

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने शनिवारी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले आहे. अॅथलेटिक्समधील भारताचे हे पहिलेच ऑलिम्पिक पदक ठरले. त्याच्या ऐतिहासिक कामगिरीवर देशभरातील लोक कौतुकाचा वर्षाव करत आहेत. तसेच बॉलिवूडकरांनी देखील सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे आणि त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री तापसी पन्नूने ट्विटरवर लिहिले की, हे सुवर्ण आहे. मी आनंदाने नाचते आहे. या तरूण व्यक्ती नीरज चोप्राने इतिहास रचला आहे.


अभिषेक बच्चनने हॅशटॅगमध्ये नीरज चोप्रा लिहित फक्त येस लिहिले.


तर अक्षय कुमारने लिहिले की, हे गोल्ड आहे. या ऐतिहासिक विजयासाठी मनापासून शुभेच्छा नीरज चोप्रा. तू त्या सर्व आनंदाच्या अश्रूसाठी जबाबदार आहे. शानदार.


बिग बॉस फेम शहनाज गिलने ट्विट केले की, हे गोल्ड आहे. या ऐतिहासिक विजयासाठी मनापासून शुभेच्छा.


मॉडेल आणि अभिनेत्री सोफी चौधरीनेे नीरजचा फोटो शेअर करत आपला आनंद व्यक्त केला. तिने ट्विटमध्ये लिहिले की, हे एपिक आहे. पहिल्यांदा अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक मिळाले आहे. तू दमदार होता नीरज चोप्रा. तुझा खूप अभिमान वाटतो.


अभिनेता सनी देओलने लिहिले की, काय दमदार परफॉर्मन्स होता. भारताला तुझा अभिमान वाटतो.


अजय देवगणने लिहिले की, टोकियो ऑलिम्पिकमधील विजयासाठी अभिनंदन नीरज चोप्रा. तुला आणखी ताकद मिळो. तुझा तुझ्या आई वडिलांना आणि भारताला गर्व वाटतो. खूप दमदार आहे.

Web Title: Tokyo Olympics, Neeraj Chopra: Neeraj Chopra made history by winning gold medal in Olympics, Bollywoodkars express happiness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app