तनिष्कची आणखी एक जाहिरात पाहून भडकले लोक; म्हणाले, हे सांगणारे तुम्ही कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 04:53 PM2020-11-11T16:53:33+5:302020-11-11T16:58:06+5:30

महिनाभरात दुसऱ्यांदा जाहिरात मागे घेण्याची नामुष्की

Tanishq does it again, pulls down Diwali commercial after massive backlash on social media | तनिष्कची आणखी एक जाहिरात पाहून भडकले लोक; म्हणाले, हे सांगणारे तुम्ही कोण?

तनिष्कची आणखी एक जाहिरात पाहून भडकले लोक; म्हणाले, हे सांगणारे तुम्ही कोण?

googlenewsNext
ठळक मुद्देसंबंधित जाहिरातीला विरोध होत असल्याचे पाहून तनिष्कने लगेच ही जाहिरात मागे घेतली.

प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड तनिष्कच्या एका जाहिरातीवरून झालेला राडा तुम्हाला आठवत असेलच. या जाहिरातीत एका हिंदू महिलेला मुस्लिम घराची सून दाखवण्यात आले होते.  लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत लोकांनी तनिष्कच्या या जाहिरातीला विरोध केला होता. या विरोधामुळे तनिष्कला ही जाहिरात मागे घ्यावी लागली होती. आता पुन्हा एकदा तनिष्कवर अशीच जाहिरात मागे घेण्याची वेळ आलीय. होय, आपल्या दिवाळीच्या जाहिरातीमुळे तनिष्कला वादाचा सामना करावा लागला आणि यानंतर महिन्याभरात दुसºयांदा आपली जाहिरात मागे घेण्याची नामुष्की तनिष्कवर ओढवली.

काय आहे वाद
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तनिष्कने एक नवी जाहिरात प्रसारित केली.   नीना गुप्ता, सयानी गुप्ता, अलाया एफ आणि निम्रत कौर अशा अभिनेत्रींना घेऊन ही जाहिरात बनवण्यात आली आहे. या दिवाळीत  फटाके वाजवण्याऐवजी काही वेळ आपल्या आईसह घालवणे ती पसंत करेल, असे या जाहिरातीत सयानी गुप्ता म्हणते. शिवाय यंदा फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करा, असे आवाहनही ती करते. दिवाळला फटाके वाजवू नका, नेमका हा जाहिरातीत दिलेला संदेश लोकांना खटकला आणि यावरून सोशल मीडियावर वाद सुरु झाला. हिंदूंनी त्यांचा सण कसा साजरा करावा, हे सांगणारे तुम्ही कोण? असा सवाल करत नेटक-यांनी तनिष्कच्या जाहिरातीला विरोध केला.

भाजपाचे नेते सी.टी. रवी यांनीही या जाहिरातीला विरोध केला. हिंदूंनी आपला सण कसा साजरा करावा, हे आता दुसरे आम्हाला सांगणार का? कंपन्यांनी आपली उत्पादने विकावीत. आम्ही फटाके वाजवावे की नाही, याबाबत आम्हाला ज्ञान देण्याची गरज नाही, असे tweet त्यांनी केले.

मागे घेतली जाहिरात
संबंधित जाहिरातीला विरोध होत असल्याचे पाहून तनिष्कने लगेच ही जाहिरात मागे घेतली.  50 सेकंदची ही जाहिरात आता ट्विटर आणि युट्युब पेजवरुन हटवण्यात आली आहे. परंतु इन्स्टाग्रामच्या पेजवर अजूनही ही जाहिरात पहायला मिळते. याबाबत कंपनीने कोणतीही टिप्पणी करायला नकार दिला आहे.

हे ‘किएटीव्ह’ दहशतवादी...! कंगना राणौत आता ‘जाहिराती’वर नाराज  

काही धर्मांधांच्या विरोधामुळे...; ‘तनिष्क’च्या जाहिरातीचा विरोध करणार्‍यांवर भडकली मिनी माथूर 

Web Title: Tanishq does it again, pulls down Diwali commercial after massive backlash on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :tanishqतनिष्क