तमन्ना भाटियाच्या आई- वडिलांना कोरोनाची लागण, सोशल मीडियावर दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 19:20 IST2020-08-26T19:19:09+5:302020-08-26T19:20:54+5:30

तमन्नासह तिच्या घरात काम करणा-या कर्मचा-यांचीही टेस्ट करण्यात आली होती. त्यांचेही रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.

Tamannaah Bhatia's parents test positive for COVID-19 | तमन्ना भाटियाच्या आई- वडिलांना कोरोनाची लागण, सोशल मीडियावर दिली माहिती

तमन्ना भाटियाच्या आई- वडिलांना कोरोनाची लागण, सोशल मीडियावर दिली माहिती

देशात कोरोना रुग्णांच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ आहे. तमन्ना भाटीयाच्या घरातही कोरोनाने शिरकाव केला आहे. तमन्नाच्या आई वडिल दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान तमन्नाचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला असल्याचे खुद्द तमन्नानेच सोशल मीडियावर माहिती दिली आहे. लक्षणं आढळली नसली तरीही योग्य खबरदारी घेत काळजी घेत सुरक्षित असल्याचे सांगितले आहे.दुर्भाग्याने आई- वडिल पॉझिटीव्ह आढळल्याने सध्या ती चिंतेत आहे.


तमन्नासह तिच्या घरात काम करणा-या कर्मचा-यांचीही टेस्ट करण्यात आली होती. त्यांचेही रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. सध्या सगळे घरीच असून योग्य खबरदारी घेत  तिने सांगितले आहे. 'खूप सतर्क रहा आपली आणि इतरांची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी शक्य ते सगळे उपाय करा. अशी पोस्ट करत तिने काळजी घेण्याचे आवाहन केलं.

काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन याशिवाय अभिनेत्री रेखा यांच्या घरातील सुरक्षा रक्षक , आमिर खान, करण जोहर, बोनी कपूर यांच्या स्टाफनाही कोरोना झाला होता. तसंच कित्येक टीव्ही कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली  होती. सगळ्यांनीच कोरोनावर मात करत घरी परतले आहेत. 

Web Title: Tamannaah Bhatia's parents test positive for COVID-19