सलमान खानबद्दल बोलताना सुशांत म्हणाला होता "मुझे बहोत डर लगता है......."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 15:25 IST2020-08-26T15:24:42+5:302020-08-26T15:25:24+5:30
सलमान खानचा जाहिर निषेधच करत असल्याचे पाहायला मिळत आहे. सुशांतला सलमान खानमुळेही अनेकदा काम मिळाली नसल्याचे समोर आले आहे.

सलमान खानबद्दल बोलताना सुशांत म्हणाला होता "मुझे बहोत डर लगता है......."
बॉलिवूडमधली गटबाजी मुळेच सुशांत नैराश्येत होता आणि म्हणूनच त्याने इतक्या टोकाचे पाऊच उचलत स्वतःचे आयुष्यच संपवले. घराणेशाहीला बढावा देणारे करण जोहर, सलमान खान सारख्या लोकांमुळेच येथे आता टलेंटला महत्त्व नाही. वेळीच या गोष्टीला आळा घातला नाही तर सुशांत सारखे अनेक कलाकार अशाच प्रकारे स्वतःला संपवतली. त्यामुळे सध्या बॉलिवूडमध्ये सुरू असलेली घराणेशाहीवर खूप चर्चा रंगत आहेत. अशात सुशांतचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
व्हिडीओमध्ये सुशांत सलमान विषयी बोलताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ चर्चेत आहे. एका पुरस्कार सोहळ्यातील रेड कार्पेटवरचा हा व्हिडीओ असावा, यात अँकर सुशांतला सलमान खानविषयी प्रश्न विचारताना दिसते. तेव्हा अगदी आदराने सलमानविषयी बोलताना दिसतोय. सलमान खान हा सुपरस्टार असल्याचे तो सांगतो.
तुर्तास सुशांतच्या निधनानंतर त्याचे अनेक जुने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुशांतचा आणखीन एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांचा संताप होत आहे. सलमान खानचा जाहिर निषेधच करत असल्याचे पाहायला मिळत आहे. सुशांतला सलमान खानमुळेही अनेकदा काम मिळाली नसल्याचे समोर आले आहे.
सुशांतला कोणताही सिनेमा मिळू नये यासाठी करण जोहर आणि सलमानने मिळून षडयंत्रच रचले होते. मुळात करणनने सुशांत आणि जॅकलीनला 'ड्राइव्ह' सिनेमासाठी साइन केले होते. मात्र याच काळात जॅकलीनला 'रेस-3' मध्ये काम करण्याची संधी मिळाली. करणने सुशांतला दुसरी कोणतीच फिल्म साइन करु दिली नव्हती. मात्र जॅकलीनला सलमानच्या फिल्ममध्ये काम करु दिले. यामुळे ड्राइव्हच्या शूटिंगला उशीर झाला.
इतकेच नाहीतर सुशांतला इंडस्ट्रीमध्ये सातत्याने अपमानित केले जात होते. कलाविश्वात आपल्यावर कोणाचाही वरदहस्त नसल्याचं जाणत असणाऱ्या सुशांतला या झगमगणाऱ्या दुनियेतून आपल्याला दूर फेकूनही दिलं जाऊ शकतं अशी धास्ती एकेकाळी सतावत होती. म्हणूनच माझ्यावर कोणाचा वरदहस्त नाही. तुम्हीच सारे माझे गॉडफादर आहात. इच्छा असेल तर कृपा करुन सिनेमा पाहा. तरच मी कलाविश्वात तग धरु शकेन. तुम्हाला खूप सारं प्रेम....' म्हणत टविटही केले होते.