पहाटे ४ वाजता मिका सिंग गेला होता सनी लिओनीच्या घरी; डॅनिअलची होती 'ही' रिअ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 06:05 PM2022-01-10T18:05:55+5:302022-01-10T18:06:55+5:30

Mika singh: 'द कपिल शर्मा शो'मध्ये मिकानेच आपण पहाटे चार वाजता सनीच्या घरी गेल्याचा खुलासा केला होता.

sunny leone and mika singh on kapil sharma show story of america home | पहाटे ४ वाजता मिका सिंग गेला होता सनी लिओनीच्या घरी; डॅनिअलची होती 'ही' रिअ‍ॅक्शन

पहाटे ४ वाजता मिका सिंग गेला होता सनी लिओनीच्या घरी; डॅनिअलची होती 'ही' रिअ‍ॅक्शन

googlenewsNext

पॉर्न इंडस्ट्रीला रामराम करत बॉलिवूडची वाट धरलेली अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी (sunny leone). आपल्या सौंदर्यामुळे आणि अभिनयशैलीमुळे सनीने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहे. त्यामुळे अनेकदा सनी तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमुळेही चर्चेत येते. अलिकडेच सनीने 'द कपिल शर्मा शो' या रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिच्यासोबत मिका सिंगदेखील (mika singh) उपस्थित होता. विशेष म्हणजे हा कार्यक्रम सुरु असतांना एकदा पहाटे ४ वाजता आपण सनीच्या घरी गेलो होता असा खुलासा मिकाने स्वत: केला.

'द कपिल शर्मा शो' (the kapil sharma show) या कार्यक्रमात मिका सिंगनेसनी लिओनी आणि तिचा पती डॅनिअल वेबर यांच्याविषयी त्याचं मत मांडलं. तसंच एकदा अमेरिकेत त्याच्यासोबत घडलेला एक किस्साही त्याने शेअर केला.

"एकदा अमेरिकेतील लॉस एन्जलिसमध्ये माझा एक कार्यक्रम होता. तो कार्यक्रम साधारणपणे ११.३० पर्यंत संपणार होता. आणि,त्यानंतर मी सनीच्या घरी जाणार होतो. पण, कार्यक्रम संपायला प्रचंड उशीर झाला. साधारणपणे पहाटे ४ वाजता मी सनीच्या घरी पोहोचलो. त्यावेळी तिच्या दाराची बेल वाजवतानाही मला विचित्र वाटत होतं", असं मिका सिंग म्हणाला. 

पुढे तो म्हणतो,  "सनीच्या घराची बेल वाजवल्यानंतर सगळ्यात आधी कोणताही गैरसमज करुन घेऊ नका असं मी त्यांना सांगितलं. पण, सनीच्या नवऱ्याने डॅनिअल खूप चांगला आहे. त्याने माझं प्रेमाने स्वागत केलं आणि पहाटे ४ वाजता माझ्यासाठी पिझ्झा आणि कॉफी करुन दिली."

दरम्यान, अलिकडेच सनी लिओनीचं एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.  या गाण्यावर सोशल मीडियावर चांगलाच वाद पेटल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नाही तर मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी सनीसह तिच्या सगळ्या टीमवर कारवाई करण्याची धमकीही दिली होती. त्यानंतर या गाण्याचे लिरिक्स आणि नाव बदलण्यात आलं.

Web Title: sunny leone and mika singh on kapil sharma show story of america home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.