story of sonu sood roommate viral on social media-ram | दोस्ती दुनियादारी! सोनू सूदच्या ‘यारों की कहानी, यारों की जुबानी...’

दोस्ती दुनियादारी! सोनू सूदच्या ‘यारों की कहानी, यारों की जुबानी...’

ठळक मुद्देमेधावनी मोहन नामक फेसबुक अकाऊंटवरून सोनूसंदर्भातील आणखी एक किस्सा शेअर केला गेला.

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सध्या सगळ्यांचा हिरो ठरला आहे. स्थलांतरीत मजूरच नाही तर नेटक-यांनीही सोनूला डोक्यावर घेतलेय. शेवटी सोनूने कामच तसे केले. लॉकडाऊनमुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या हजारो मजूरांना सोनूने स्वखर्चाने आपआपल्या गावी पोहोचवले. रस्त्यावरची त्यांची पायपीट थांबवली. त्यामुळे सोशल मीडियावर सोनूवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यामुळे ट्विटरवर सोनू टॉप ट्रेंडमध्ये आहे. इतकेच नाही तर सोनूच्या ‘दोस्ती दुनियादारी’चे अनेक किस्सेही व्हायरल होत आहेत.

 
मित्रासाठी गहाण ठेवली बाईक...

 एका चाहत्याने सोनू सूद किती दिलदार आहे याचा किस्सा सोशल मीडियावर शेअर केला. या चाहत्याने लिहिले,‘सर, मी तुम्हाला1994 पासून ओळखतो. त्यावेळीही तुम्ही तुमच्या एका मित्राच्या मदतीसाठी स्वत:ची बाईक गहाण ठेवण्यासाठी तयार होतात. आज देखील त्याच भावनेने तुम्ही लोकांची मदत करत आहात. तुम्ही खूप चांगले काम करत आहात. बाबांकडून मी तुमच्याविषयी खूप काही ऐकत असतो.’  
 चाहत्याने हा किस्सा शेअर करताना सोनूला आपल्या ट्विटमध्ये टॅग केले होते. सोनूने लगेच त्यावर रिप्लाय दिला़ ‘तुझी स्मरणशक्ती खूप चांगली आहे’, असे त्याने लिहिले.


  
अन् मित्राला मारली कडकडून मिठी
मेधावनी मोहन नामक फेसबुक अकाऊंटवरून सोनूसंदर्भातील आणखी एक किस्सा शेअर केला गेला. यात 2015 च्या एका जुन्या घटनेचा उल्लेख आहे. होय, सोनू सूद 2015 साली एका इव्हेंटसाठी झांसीला आला होता. साहजिकच सोनूला पाहण्यासाठी गर्दी जमली होती. या गर्दीत एक साधारण कपड्यांमधील व्यक्तीही होती. काहीशी भांबावलेली, काहीशी अवघडलेली. तिचे नाव संजय. हा संजय सोनू सूदचा बॅचमेट होता. सोनू आपल्याला ओळखले का? असा प्रश्न संजयला पडला होता. ओळखले तर ठीक नाही तर परत जाईल, असे संजयच्या मनात होते. कारण कॉलेजमध्ये संजय व सोनूचे भांडण झाले होते, त्यामुळे सोनू आपल्याला पाहून ओळख दाखवेल की नाही, अशी शंका संजयच्या मनात होती. ब-याच प्रतीक्षेनंतर सोनूची गाडी इव्हेंटच्या ठिकाणी आली आणि संजय सोनूला भेटण्यासाठी पुढे सरकला. त्याने सोनूला मोठ्याने हाक मारली आणि जागीच थबकला. सोनूची नजर त्याच्यावर गेली आणि त्याला पाहताच सोनू धावत धावत त्याच्याकडे गेला. होय, सोनूने संजयला कडकडून मिठी मारली. अनेक वर्षांनंतर दोन मित्र भेटले. या भेटीने सगळेच भारावले...

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: story of sonu sood roommate viral on social media-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.