Sonu Sood funny reply to user asking to increase internet speed | 'इंटरनेट स्पीड वाढवून दे' म्हणणाऱ्या यूजरला सोनू सूदचं मजेदार उत्तर, जे वाचून पोट धरून हसाल....

'इंटरनेट स्पीड वाढवून दे' म्हणणाऱ्या यूजरला सोनू सूदचं मजेदार उत्तर, जे वाचून पोट धरून हसाल....

लॉकडाऊनमध्ये ज्याप्रमाणे अभिनेता सोनू सूदने दिवस-रात्र लोकांची मदत केली त्यानंतर लोकांच्या त्याच्याकडून फारच अपेक्षा वाढल्या आहेत. प्रत्येक व्यक्ती बारीक-सारीक गोष्टींसाठीही त्याच्याकडे मदत माग आहेत. अशाच एका यूजरने गमतीदारपणे सोनू सूदकडे इंटरनेट स्पीड वाढवण्याची मागणी केली. या यूजरने ही मागणी ट्विट करून केली. आश्चर्याची बाब म्हणजे यावर सोनूनेही मजेदार रिप्लाय दिलाय.

सोनूने या व्यक्तीला उत्तर दिलं की, 'तुम्ही उद्या सकाळपर्यंत मॅनेज करू शकाल का? सध्या कुणाचातरी कॉम्प्युटर, कुणाचं लग्न फिक्स करण्यात, कुणाचं ट्रेनचं तिकीट कन्फर्म करण्यात, कुणाची पाण्याची समस्या सोडवण्यात थोडा बिझी आहे. लोकांनी मला इतकी महत्वाची कामे देऊन ठेवली आहेत'.

याआधीही अशाप्रकारे काही यूजर्सनी गंमत केली होती. मात्र, सोनूनेही त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले होते. यूजर्सना ट्विट्स करून उत्तर देण्याबाबत सोनूचं लोकांनी भरभरून कौतुकही केलं आहे. त्याा ह्यूमर लोकांना फारच आवडला आहे.

दरम्यान, सोनूचं मदतीचं काम सुरूच आहे. त्याने एका यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला पुस्तके घेण्यास मदत केली. तसेच साउथमधील एका परिवाराला त्याने ट्रॅक्टरची मदत केली. सोनूने लॉकडाऊनदरम्यान बेरोजगार झालेल्यांना रोजगारही दिली आहे. त्यासाठी त्याने वेबसाइट सुरू केली. तसेच परदेशातून विद्यार्थ्यांनाही परत आणण्याचा त्याचा प्रयत्न सुरू आहे.

हे पण वाचा :

कॅन्सरवरील उपचारासाठी परदेशात जाण्यापूर्वी संजय दत्त पूर्ण करणार 'हे' काम

'अंडरवर्ल्डच्या उरल्या सुरल्या गोष्टींवर चालतं बॉलिवूड', कंगना राणौतचा खळबळजनक खुलासा

प्रेग्नेंसीमध्ये कामवर परतली करिना कपूर, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sonu Sood funny reply to user asking to increase internet speed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.