'Bollywood runs on the rest of the underworld', Kangana Ranaut's sensational revelation | 'अंडरवर्ल्डच्या उरल्या सुरल्या गोष्टींवर चालतं बॉलिवूड', कंगना राणौतचा खळबळजनक खुलासा

'अंडरवर्ल्डच्या उरल्या सुरल्या गोष्टींवर चालतं बॉलिवूड', कंगना राणौतचा खळबळजनक खुलासा

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येत असते. गेल्या काही दिवसांपासून सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावरील विधानांमुळे ती सातत्याने चर्चेत आहे. त्यात आता तिने केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे पुन्हा एकदा सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने अंडरवर्ल्ड आणि बॉलिवूडमध्ये असणाऱ्या नात्याबाबतचे गौप्यस्फोट केला आहे. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.

कंगना राणौतच्या टीम कंगना राणौत या ट्विटर अकाऊंटवरुन अंडरवर्ल्डच्या उरल्या सुरल्या गोष्टींवर बॉलिवूड चालते, असे मत शेअर केले आहे. यासोबतच तिने पुन्हा एकदा करण जोहरवरही निशाणा साधला आहे. कंगना राणौतने ट्विट केले की, हे खरं आहे. बॉलिवूड अंडरवर्ल्डच्या उरल्यासुरल्यावरच सुरु आहे. दहावी नापास पप्पांचा पप्पू आणि पप्पांची परी असंच काहीसे. त्यांचा वेडेपणा आणि अकार्यक्षमता 'कॉफी विथ करण'सारख्या कार्यक्रमांमध्ये दाद मिळवून जाते. ते अधिक प्रमाणात हिंदू फोबिकही आहेत.सुब्रमण्यम स्वामी यांच्या ट्विटला उत्तर देत कंगनाची ही प्रतिक्रिया पाहायला मिळाली. ज्यानंतर तिच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया देण्यासही सुरुवात केली.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 'Bollywood runs on the rest of the underworld', Kangana Ranaut's sensational revelation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.