-रवींद्र मोरे
सिने जगतात स्वत:ला सिद्ध करणे एवढे सोपे काम नाही. त्यातच अभिनेत्रींना तर दुप्पट मेहनतीचा सामना करावा लागतो. शिवाय ती अभिनेत्री जर आई असेल तर तिला अभिनयाबरोबरच आईचेही कर्तव्य पार पाडून इंडस्ट्रीतील स्वत:चे स्थान अबाधित ठेवावे लागते. बॉलिवूडमध्ये अशाच काही सिंगल मदर्स आहेत ज्यांनी संघर्षातून मातृत्व सिद्ध केले आहे.

* सुष्मिता सेन


माजी मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री सुष्मिता सेन ही अविवाहित आहे. मात्र तिने दोन अनाथ मुलींना दत्तक घेऊन त्यांना चांगले आयुष्य देणे हाच आपल्या जीवनातील प्राधान्यक्रम ठरविला आहे. एक आई म्हणून ती सर्व जबाबदाऱ्या पार पाडत आहे. मुलींच्या पालनपोषणासाठी तिने आपल्या फिल्मी करिअरकडेदेखील दुर्लक्ष केले आहे. आज तिच्या आयुष्यात मुली याच प्राथमिकता आहेत.

* कोंकणा सेन


बॉलिवूडमधील सिंगल मदरपैकी एक सलेली कोंकणा सेन ही नेहमीच तिच्या मातृत्वामुळे चर्चेत असते. कारण तिने आपल्या मुलाच्या पालनपोषणासाठी इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला. रणवीर शौरी याच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर कोंकणाने आपल्या मुलाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. आज ती सिंगल मदर म्हणून जगत असताना आईचे सर्व कर्तव्य पार पाडताना दिसत आहे.

* करिश्मा कपूर


नवºयाशी घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्री करिश्मा कपूर आपल्या मुलांचा सांभाळ करण्यात कुठलीच कसर सोडताना दिसत नाही. ती सिंगल मदर बनून मुलांच्या शिक्षणापासून ते त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असताना दिसते. सध्या करिश्माची दोन्ही मुले शिक्षण घेत आहेत.

* पूजा बेदी


अभिनेत्री आणि टीव्ही होस्ट पूजा बेदी सिंगल मदर असून, आपल्या मुलांचे पालनपोषण करण्यात ती कुठलाच कसूर ठेवत नाही. पूजाने फरहान इब्राहिमशी लग्न केले होते. मात्र काही मतभेदांमुळे हे दोघे विभक्त झाले. घटस्फोटानंतर पूजाने आपल्या मुलांची जबाबदारी स्वीकारली. आता ती एकटीच मुलगा आणि मुलींचा सांभाळ करीत आहे.

* अमृता सिंग


अभिनेता सैफ अली खान याच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर अमृता सिंगने आपल्या दोन्ही मुलांची जबाबदारी अतिशय समर्थपणे पार पाडली. अमृताची मुलगी सारा अली खानने ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं आहे. अमृताने हतबल न होता आपल्या मुलांना इंडस्ट्रीत स्वत:ला सिद्ध करण्याच्या लायक बनविले असे म्हटले तर चुकीचे ठरू नये.

Web Title: Single Moms Of Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.