मेकअप करतानाचा सुहानाचा फोटो होतोय व्हायरल, कमेंट्समध्ये कुणी म्हणतंय प्रिन्सेस तर कुणी...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 07:33 PM2019-08-26T19:33:01+5:302019-08-26T19:33:21+5:30

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरूख खानची मुलगी सुहाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच चर्चेत आली आहे.

Shahrukh's daughter Suhana was doing make-up, photo goes viral | मेकअप करतानाचा सुहानाचा फोटो होतोय व्हायरल, कमेंट्समध्ये कुणी म्हणतंय प्रिन्सेस तर कुणी...

मेकअप करतानाचा सुहानाचा फोटो होतोय व्हायरल, कमेंट्समध्ये कुणी म्हणतंय प्रिन्सेस तर कुणी...

googlenewsNext

बॉलिवूडचे स्टार किड्स काहीना काही कारणास्तव चर्चेत येत असतात. मात्र बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरूख खानची मुलगी सुहाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच चर्चेत आली आहे. ती सोशल मीडियावर देखील प्रसिद्ध आहे. तिचा फॅन फॉलोविंगदेखील खूप आहे. बऱ्याच दिवसांपासून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान तिचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. इंस्टाग्रामवरील एका फॅन पेजवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. 


सुहानाने नुकतंच तिचं ग्रॅज्युएशन लंडनमधील आर्डिगली कॉलेजमधून केलं आहे. सध्या ती 'द ग्रे पार्ट ऑफ ब्ल्यू' या शॉर्ट फिल्ममध्ये काम करत आहे.

सुहानाच्या एका फॅन पेजने तिचा याच प्रोजेक्ट दरम्यानचा एक फोटो सोशल मी़डियावर शेअर केला आहे आणि तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे तर काहींनी तिला ट्रोल देखील केलं आहे. तिच्या एका चाहत्यानं तू प्रिन्सेससारखी दिसतेस असं म्हटलंय तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलं की, काही दिवसांनी तर तुला लग्नच करायचं आहे.


'द ग्रे पार्ट ऑफ ब्ल्यू' या शॉर्ट फिल्ममध्ये सुहाना अभिनय करणार आहे. या शॉर्ट फिल्मचं दिग्दर्शन तिचाच मित्र थियो जिमेनो करत आहे. जिमेनो ने शॉर्ट फिल्मचं पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर केलं. या पोस्टरवर सुहानासोबत रॉबिन गोनेलाही दिसत आहे.

याआधी सुहानाने काही काळ थिएटरमध्येही काम केलं. तिची ही शॉर्ट फिल्म पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत आणि याशिवाय ते तिच्या बॉलिवूड पदार्पणाचीही प्रतीक्षा करत आहेत. 

 

Web Title: Shahrukh's daughter Suhana was doing make-up, photo goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.