बॉलिवूड अभिनेता संजय दत्त वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असतो. मात्र एकेकाळी त्याची दिवंगत पहिली पत्नी आणि घटस्फोट पेज ३च्या गॉसिपचा हिस्सा बनला होता. त्याच्या चाहत्यांना या मागचे कारण जाणून घ्यायचे होते.
संजय दत्त नेहमी कॉन्ट्रॉव्हर्सी राहतो. त्याचे भूतकाळ खूप डार्क राहिले आहे. मग अमली पदार्थांचे सेवन असो किंवा पहिल्या लग्नाचा कटू अनुभव असो...संजय दत्तच्या जीवनात खूप चढउतार आले आहेत. बऱ्याच अडचणींचा सामना करत आज तो आनंदी जीवन जगतो आहे. जाणून घेऊयात संजय दत्त आणि ऋचा शर्माची लव्ह स्टोरी.


संजय दत्तने जेव्हा ऋचा शर्माचा फोटो मासिकात पाहिला होता तेव्हा त्याला ती खूप भावली होती. त्यानंतर संजयने तिचा नंबर कसा तरी मिळवला. संजयने तिच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी बऱ्याच गोष्टी केल्या. मात्र तिने त्याचे प्रपोजल नाकारले होते. ऋचा संजयच्या अट्रॅक्शनपासून वाचू शकली नाही आणि तिलादेखील संजय आवडू लागला. त्याच्यानंतर त्या दोघांनी १९८७ साली लग्न केले आणि एक वर्षानंतर त्रिशला दत्तचा जन्म झाला.


संजय दत्तच्या सुंदर प्रेम कथेत धक्कादायक वळण आले जेव्हा ऋचाला कर्करोग झाला होता. त्यानंतर अशी चर्चा ऐकायला मिळाली की रिचाचा आजार घटस्फोटाचे  कारण होते. पण, संजय दत्तच्या नुसार, यामागे वेगळे कारण होते. १९९३ च्या मुव्ही मॅगझिननुसार, संजय दत्तने मुलाखतीत त्याने सांगितले होते की, रिचाच्या कुटुंबामुळे त्यांचा घटस्फोट झाला होता. तो म्हणाला होता की, हे आरोप खोटे आहेत, मी तशा प्रकारचा माणूस नाही. जो आपल्या पत्नीवर प्रेम करणं बंद करेल जर तिचे केस नसतील तर. हे आरोप माझ्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी लावले गेले आहेत. मी ज्या प्रकारे ऋचाला प्रोत्साहन दिले तसे मला वाटत नाही कुणी इतर करू शकत होते.


संजय दत्तने मॅगझिनमध्ये आपले मत सांगताना म्हटले की, ऋचा सोबत माझे लग्न तुटले. पुन्हा आम्ही एकत्र भेटू शकत नाही. मला ऋचाच्या विरोधात काहीच मिळाले नाही, पण तिच्या आई वडिलांना आमच्या जीवनाचे नुकसान केले. मी खूप हस्तक्षेप केला. संजय दत्तने ऋचाच्या बहिणीलादेखील दोषी ठरविले होते आणि म्हटले होते की, मुळ रुपात तिची बहिण आहे जी सगळे काही बोलत आहे आणि आमच्यात खूप तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे ही एक पती आणि पत्नीमधील एक समस्या आहे जर काही तडजोड करायची असेल तर ती ऋचा आणि माझ्यात झाली पाहिजे. ती कोण आहे जिला हस्तक्षेप करायचा आहे?


ऋचा सोबत संजयच्या झालेल्या घटस्फोटाचा कित्येकांच्या आयुष्यावर परिणाम झाला आहे. काळानुसार सर्व काही ठीक झाले आहे आणि आता संजय दत्तचे पहिली मुलगी त्रिशालासोबत चांगले नाते आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sanjay Dutt blames his first wife Richa Sharma for the divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.