salman khan mother salma khan Instagram Debut | सलमानच्या आयुष्यातील सगळ्यात जवळच्या व्यक्तीने इन्स्टाग्रामवर केला डेब्यू

सलमानच्या आयुष्यातील सगळ्यात जवळच्या व्यक्तीने इन्स्टाग्रामवर केला डेब्यू

ठळक मुद्देसलमा खान यांच्या हँडलचे नाव salmakhan1942 असून त्यांचे अकाऊंट अद्याप व्हेरीफाईड नाहीये. त्या केवळ आठ लोकांना इन्स्टाग्रावर फॉलो करतात

सलमानची आई म्हणजेच सलमा खान यांना अनेकवेळा सलमानसोबत पाहाण्यात येते. सलमानच्या आयुष्यातील ती सगळ्यात जवळची व्यक्ती असून तो त्याच्या आईबाबत प्रचंड इमोशनल आहे. सलमानच्या अनेक चित्रपटांच्या निर्मात्या देखील त्याच आहेत. सलमान आणि त्याच्या आईचे हे खास नाते अनेकवेळा आपल्याला पाहायला मिळते.

सोशल मीडियाच्या जगतात प्रत्येकालाच सोशल मीडियाविषयी आकर्षण वाटते. सलमानची आई सलमा खान यांनी आता वयाच्या 77 व्या वर्षी सोशल मीडियावर एंट्री केली असून त्यांनी इन्स्टाग्रामवर आपले अकाऊंट सुरू केले आहे. त्यांनी अद्याप कोणतीही पोस्ट इन्स्टाग्रामवर केली नसली तरी 7500 हून अधिक त्यांचे फोलोव्हर्स बनले आहे. त्यांच्या हँडलचे नाव salmakhan1942 असून त्यांचे अकाऊंट अद्याप व्हेरीफाईड नाहीये. त्या केवळ आठ लोकांना इन्स्टाग्रावर फॉलो करतात. यामध्ये अरबाजची गर्लफ्रेंड जॉर्जिया, सोहेल खान, हेलन खान, अतुल अग्निहोत्री, अरबाज खान, आयुष शर्मा, सलमान खान आणि नताचा चरक या लोकांचा समावेश आहे. जॉर्जिया वगळता सगळ्याच सलमान खानच्या कुटुंबियातील मंडळी आहेत.

सलमा खान या सलीम खान यांच्या पहिल्या पत्नी असून त्यांचे लग्नाच्या आधी नाव सुशीला चरक होते. त्यांनी सलीम खान यांच्यासोबत लग्न करण्यासाठी त्यांचे नाव बदलले. सलमा आणि सलीम खान यांना सलमान, सोहेल अरबाज ही तीन मुले तर अलविरा ही एक मुलगी आहे. अर्पिता ही देखील त्यांचीच मुलगी असून ती लहान असताना तिला खान कुटुंबियांनी दत्तक घेतले होते. 

Web Title: salman khan mother salma khan Instagram Debut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.